AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी ती चूक केलीच, जे नको होतं तेच…इराणच्या युद्धात चिंता वाढवणारी अपडेट!

पोप लिओ यांनी अनेकदा डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या धोरणांना विरोध केला आहे. पोप यांनी व्हेनेझुएलाविरोधात केलेल्या कारवाईला विरोध दर्शवला होता. तसेच त्यांचा इराणविरोधातील युद्धालाही विरोध आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प हे पोप लिओ यांच्यावर सतत टीका करत असतात.

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी ती चूक केलीच, जे नको होतं तेच...इराणच्या युद्धात चिंता वाढवणारी अपडेट!
donald trump and pope leoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 14, 2026 | 4:26 PM
Share

Donald Trump : अमेरिका आणि इराण यांची इस्लामाबादमधील बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी केली आहे. ही नाकेबंदी इराण तसेच इतर बंदरांवरही समान रुपाने लागू असेल, असं अमेरिकेने सांगितले आहे. अमेरिकेच्या या भूमिकेने आता हे युद्ध जास्तच भडकण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता अमेरिकेत एक नवा वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ख्रिश्चन धर्माचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप लिओ (चौदावे) यांनाच थेट विरोध करायला सुरुवात केली आहे. तज्ज्ञांच्या मते ट्रम्प लिओ यांना विरोध करून खूप मोठी चूक करत आहेत.

एआय फोटोचा केला होता वापर

पोप लिओ यांनी अनेकदा डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या धोरणांना विरोध केला आहे. पोप यांनी व्हेनेझुएलाविरोधात केलेल्या कारवाईला विरोध दर्शवला होता. तसेच त्यांचा इराणविरोधातील युद्धालाही विरोध आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प हे पोप लिओ यांच्यावर सतत टीका करत असतात. ट्रम्प यांनी पोप लिओ यांच्यावर टीका करताना नुकतेच एक एआय फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये ट्रम्प यांनी स्वत:चा फोटो टाकला होता. या फोटोत त्यांनी स्वत:ला येशू ख्रिस्त दाखवण्याचा प्रयत्न केला होता. माझ्यामुळेच पोप सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकले, असे त्यांनी या फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. या फोटोमुळे वाद वाढल्यानंतर त्यांनी हा फोटो नंकर डिलीट केला होता.

ट्रम्प यांना नेमका काय फटका बसणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राजकारणात ख्रिश्चन मतदारांचा चांगला पाठिंबा राहिलेला आहे. 2016 आणि 2024 सालच्या निवडणुकीत ख्रिश्चन मतदारांनी ट्रम्प यांना चांगली मतं दिली होती. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प हे पोप लिओ यांना थेट विरोध करताना दिसत आहेत. त्यामुळे हेच ख्रिश्चन धर्मीय मतदार ट्रम्प यांच्या तसेच त्यांच्या पक्षाविरोधात एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रम्प यांना फटका बसू शकतो, असे मत तेथील राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. आता भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?