अमेरिकेची मोठी चाल, १२ हजार किमीवरून चीनला दिला शह
जगाच्या राजकारणातही कोणी कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो. नेपाळमधील उठावास अमेरिकेचा पाठबळ होते असे म्हटले जात आहे. नेपाळमधील सत्तापालट हा चीनला मोठा झटका असल्याने अमेरिकेचे पारडे जड झाले आहे.

नेपाळने केवळ दोन दिवसांच्या तरुणांच्या आंदोलनाने पंतप्रधान के.पी.ओली यांना सत्तेबाहेर केले आहे. नेपाळमध्ये आठवडाभरात जे घडले त्याचा परिणाम केवळ नेपाळच्या राजकारणापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण आशियाच्या राजकारणावर होणार आहे. कारण ओली यांना चीनचा सर्वात जवळचा मानले जात होते. या खेळीतून १२००० किलोमीटरवरुन अमेरिकेने चीनवर मात केल्याचे म्हटले जात आहे.
चीनच्या कह्यात गेलेले के.पी.ओली यांचे पद जाण्यामागे अमेरिकेची मोठी चाल मानली जात आहे. आणि थेट चीनला मोठा झटका मानला जात आहे. नेपाळने नेहमीच भारत आणि चीन दरम्यान संतुलन कायम ठेवले आहे. परंतू ओली यांच्या कार्यकाळात ते चीनला जास्त महत्व देऊ लागले होते. ओली यांनी बीजिंगच्या “बेल्ट एण्ड रोड इनिशिएटिव्ह” ला पाठींबा दिला होता. एवढेच काय चीनच्या विजय दिवस परेडमध्ये देखील ते सामील झाले होते. हे सर्व अमेरिकेला खटकत होते.
नेपालच्या आंदोलनात अमेरिकेचे कनेक्शन
मीडियाच्या बातम्यानुसार अमेरिकेने या वर्षी नेपाळमध्ये मिलेनियम चॅलेंज कॉम्पॅक्ट (MCC)ला पुन्हा जीवंत केले आहे.हा प्रकल्प सुमारे ५०० दशलक्ष डॉलरच्या मदतीने ऊर्जा आणि रस्ते अशा सुविधेला मजबूत केले आहे. हा चीनच्या “बेल्ट एण्ड रोड” ला थेट टक्कर देणारा प्रकल्प आहे. यामुळे विश्लेषक म्हणतात की ओलीच्या विरोधात संताप आणि आंदोलनात अमेरिकेचा मोठा हात होता.
आता परिस्थिती ही आहे की ओली नेपाळमधून परांगदा झाले आहेत. आता अंतरिम पंतप्रधान पदाची जबाबदारी सुशीला कार्की सांभाळणार आहेत. कार्की यांचे भारताशी चांगले नाते आहे, त्यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतून पदवी घेतलेली आहे. आणि मोदी यांचे नाव घेऊन त्यांच्या कार्यशैलीचे कौतूक केले आहेत. त्यामुळे नेपाळचे राजकारण आता चीनपासून दूर आणि भारत-अमेरिकेच्याजवळ जाताना दिसत आहे.
भारत- अमेरिका यांच्यात समेट
अमेरिका आणि भारतात टॅरिफवरुन तणाव जरुर होता. परंतू हळूहळू हा तणाव निवळू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात पुन्हा बोलणी सुरु झाली आहेत. पुढच्या आठवड्यात अमेरिकेचे प्रतिनिधी भारत दौऱ्यावर येऊ शकतात. त्यावेळी विमानांसंदर्भात करार होऊ शकतो. टॅरिफ संदर्भात येत्या काही दिवसात स्पष्टता येऊ शकते. अमेरिका आणि भारताच्या संबंधाची घसरलेली गाडी रुळांवर येऊ शकते. त्यामुळे आता चीनवर दबाव वाढला आहे. कारण आशियात चीनला कोणी प्रतिस्पर्धी असेल तो भारतच आहे. अमेरिकेला हे माहिती असल्यानेच अमेरिका पुन्हा संबंध सुधारावेत यासाठी प्रयत्न करीत आहेत.
पाकिस्तानला स्वत:च्या कळपात खेचणार
पाकिस्तान अनेक वर्षांपासून चीनचा सर्वात मोठा साथीदार आहे. आर्थिक मदत असो वा संरक्षण करार, बीजिंग नेहमी इस्लामाबादच्या सोबत उभा राहिला आहे. पाकिस्तान तेथील राजकारण आणि आर्थिक अडचणीशी लढत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पाकिस्तानवर जास्त मेहरबान आहेत. पाकिस्तानचे आर्मी चीफ व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांसोबत डीनरला गेले होते. हा देखील चीनला इशारा आहे. अमेरिका चीनच्या सर्वात भरोसेमंद मित्राला आपल्याकडे वळवू इच्छीत आहे.
