AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tariff War : टॅरिफच्या लढाईत भारतासोबत असलेल्या रशियासाठी एक वाईट बातमी, पुतिन यांचा खेळ बिघडण्यास सुरुवात

Tariff War : अमेरिकेसह युरोपला नडणाऱ्या रशियासाठी एक वाईट बातमी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफच्या लढाईत रशिया भारताच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. पण आता रशियाच्याचा स्वत:च्या अडचणी वाढल्या आहेत. एका रिपोर्टमधून काही महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.

Tariff War : टॅरिफच्या लढाईत भारतासोबत असलेल्या रशियासाठी एक वाईट बातमी, पुतिन यांचा खेळ बिघडण्यास सुरुवात
vladimir putin and donald trump
| Updated on: Aug 31, 2025 | 4:24 PM
Share

रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले. युरोपियन देशांनी रशियाकडून तेल खरेदी बंद केली. त्यामुळे रशियाने चीन आणि भारत या दोन देशांकडे आपला मोर्चा वळवला. भारत आणि चीन या दोन्ही देशांना स्वस्तात तेल विक्री सुरु केली. याचा भारत-चीनला फायदा झालाच. पण रशियाचाही होणारा तोटा भरुन निघाला. रशियन अर्थव्यवस्थेला भारत-चीनच्या तेल खरेदीमुळे आधार मिळाला. स्वस्तात तेल मिळत असल्यामुळे भारत-चीनचाही फायदा झाला. पण आता स्वस्त तेलाच्या नादात रशियाचा खेळ बिघडू लागला आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेला झटके बसत आहेत.

रशियाच्या प्रमुख तेल कंपन्यांना वर्ष 2025 च्या पहिल्या सहामहिन्यात मोठा आर्थिक फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये झालेली घसरण, पाश्चिमात्य देशांचे निर्बंध आणि रशियन मुद्रा रुबलची मजबुती यामुळे रशियन तेल कंपन्यांच्या कमाईवर मोठा परिणाम झालाय. रशियाची सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी Rosneft PJSC ने पहिल्या सहामहिन्यात 245 अब्ज रूबल (जवळपास 3 अब्ज डॉलर) शुद्ध नफा नोंदवला आहे. मागच्यावर्षीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास हा नफा 68 टक्क्यांनी कमी आहे. यामुळे रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे.

परदेशी बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नात घट

द इकोनॉमिक्सच्या रिपोर्टनुसार, नफ्यामध्ये झालेली मोठी घसरण फक्त Rosneft पर्यंत मर्यादीत नाहीय. रशियाच्या अन्य मोठ्या तेल कंपन्यांच्या कमाईवर सुद्धा परिणाम झालाय. एक्सपर्ट्च म्हणणं आहे की, सध्याच्या स्थितीत तेल कंपन्यांसाठी खर्च काढणं सुद्धा कठीण बनलय. पाश्चिमात्य निर्बंधांमुळे निर्यातीवर परिणाम झालाय. परदेशी बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे.

Rosneft च्या CEO ने काय सांगितलं?

“या वर्षाच्या पहिल्या सहामहिन्यात तेलाच्या किंमती कमी होत्या. कारण जगभरात तेलाच उत्पादन जास्त झालं” असं Rosneft चे CEO इगोर सेचिन यांनी सांगितलं. जागतिक मंदीच्या शक्यतेमुळे कच्चा तेलाची मागणी कमजोर झालीय. त्यामुळे रशियाचा मुख्य निर्यात तेल ब्रांड Urals ची किंमत सरासरी 58 डॉलर प्रति बॅरल होती. मागच्यावर्षीच्या तुलनेत हे 13 टक्क्याने कमी आहे.

जास्त रक्कम खर्च करावी लागली

2025 च्या पहिल्या सहामहिन्यात रशियन करन्सी रुबल मजबूत झाली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुबल 23 टक्क्याने मजबूत झाली. 31 ऑगस्टपर्यंत 1 डॉलर = 79.65 रूबलच्या जवळ पोहोचला. याचा थेट परिणाम निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर झाला. त्यांना प्रत्येक बॅरलसाठी कमी रुबल मिळाले. सोबतच केंद्रीय बँकांच्या जास्त व्याज दराच्या धोरणामुळे कंपन्यांना कर्ज फेडताना जास्त रक्कम खर्च करावी लागली.

Rosneft प्रमाणे Lukoil PJSC आणि Gazprom Neft PJSC यांच्या प्रॉफिटमध्येही 50 टक्क्यापेक्षा जास्त घसरण झालीय. Tatneft PJSC यांच्या नफ्यात 62 टक्क्य़ापर्यंत घसरण झाली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.