AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नासावर भारतीय वंशाच्या महिलेचा झेंडा, भव्या लाल जगातल्या शक्तिशाली संस्थेच्या कार्यकारी प्रमुखपदी

भारतीय वंशाच्या भव्या लाल यांची अमेरिकेतील नासाच्या अंतराळ संस्थेचे कार्यवाहक म्हणून नियुक्ती झाली आहे. | Bhavya Lal Executive Head of NASA

नासावर भारतीय वंशाच्या महिलेचा झेंडा, भव्या लाल जगातल्या शक्तिशाली संस्थेच्या कार्यकारी प्रमुखपदी
Bhavya Lal
| Updated on: Feb 02, 2021 | 8:04 AM
Share

नवी दिल्ली :  भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेने अभिमानाचा झेंडा रोवला आहे. भारतीय वंशाच्या भव्या लाल यांची अमेरिकेतील नासाच्या अंतराळ संस्थेचे कार्यवाहक म्हणून नियुक्त केले. (Appointment of Bhavya Lal an officer of Indian descent as the Executive Head of NASA)

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी भव्या लाल यांचं नाव नासाच्या परिक्षण समितीच्या सदस्य म्हणून निवडलं. अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भव्य लाल यांना अभियांत्रिकी व अवकाश तंत्रज्ञानाचा चांगला अनुभव आहे. भव्या लाल नासाच्या इनोव्हेटिव्ह अॅडव्हान्स्ड कॉन्सेप्ट्स प्रोग्राम आणि नासा अ‍ॅडव्हायझरी कौन्सिलच्या तंत्रज्ञान, नाविन्य आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या बाह्य परिषदेच्या सदस्य देखील राहिल्या आहेत.

भव्या लाल यांची कारकीर्द

भव्या लाल 2005 पासून 2020 पर्यंत इन्स्टिट्यूट फॉर डिफेंस अॅनालिसिस साइंस अँड टेक्नोलॉजी पॉलिसी इन्स्टिट्यूट (STPI)च्या रिसर्च स्टाफच्या सदस्य म्हणू न त्यांनी काम पाहिलं आहे. STPI मध्ये सहभागी होण्याअगोदर त्या C-STPS LLC च्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. या अगोदर, त्या केंब्रिजमधल्या मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राच्या संचालक होत्या. अमेरिकेच्या न्यूक्लियर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेचं अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलं आहे.

भव्या लाल यांची शैक्षणिक पात्रता

अंतराळ क्षेत्रात भव्या लाल यांचं योगदान मोठं आहे. आंतरराष्ट्रीय अॅकॅडमी ऑफ अॅस्ट्रोनॉटिक्सच्या प्रतिनिधी म्हणूनही त्यांची निवड झाली होती. भव्या शिक्षणाच्या बाबतीतही एक पाऊल पुढे आहे. अणु विज्ञानात त्यांच्याकडे बीएससी आणि एम एसस्सी आहे. जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरण आणि सार्वजनिक प्रशासनातात त्या डॉक्टरेट आहे. त्या अणु अभियांत्रिकी आणि सार्वजनिक धोरण ऑनर सोसायटीच्या सदस्य आहेत. (Appointment of Bhavya Lal an officer of Indian descent as the Executive Head of NASA)

हे ही वाचा :

कधी अंतराळातून बर्फाने झाकलेला हिमालय पाहिलाय? नासाने काढलेला हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल WOW!

नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरचा थेट मंगळावर सेल्फी, खोदकाम करताना धुळीने माखलेल्या रोबोटची जोरदार चर्चा

Alert! ताशी 24046 किमी वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतोय लघुग्रह, विमानाइतका आहे आकार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.