AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर हिंदू मंदिरांवर हल्ला, संपूर्ण देशात हिंसाचाराच्या घटना

बांग्लादेशात एका हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आलाय. तर संपूर्ण देशात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहे. तशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर हिंदू मंदिरांवर हल्ला, संपूर्ण देशात हिंसाचाराच्या घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर मुस्लीम संघटनांकडून मोठी हिंसा
| Updated on: Mar 28, 2021 | 6:22 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्यावरुन परत येताच बांग्लादेशातील हिंसाचार उसळल्याचं पाहायला मिळत आहे. बांग्लादेशात एका हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आलाय. तर संपूर्ण देशात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहे. तशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे. एका कट्टरपंथी मुस्लीम संघटनेच्या शेकडो सदस्यांनी पूर्व बांग्लादेशमधील हिंदू मंदिरांवर आणि एका रेल्वेवर हल्ला केली. पंतप्रधान मोदी यांच्या बांग्लादेश दौऱ्याविरोधात या मुस्लीम संघटनेनं हा हिंसाचार घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. इतकच नाही तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत 10 आंदोलकांचा मृत्यू झाल्याचंही कळतंय.(Attacks on Hindu temples in Bangladesh by Muslim organizations after PM Narendra Modi’s visit)

बांग्लादेशच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्यावर गेले होते. आपल्या बांग्लादेश यात्रेत पंतप्रधान मोदी यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे जवळपास 1.2 मिलियन कोरोना व्हॅक्सिन सोपवल्या. मोदींनी आपल्या दौऱ्यात बांग्लादेशकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. त्यासह भारत आणि बांग्लादेशात 5 महत्वाचे करारही झाले आहेत.

भारतीय मुस्लिमांप्रति मोदींवर भेदभावाचा आरोप

पंतप्रधान मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर तिथल्या इस्लामिक संघटनांनी मोदींवर भारतीय मुस्लिमांप्रती भेदभावाचा आरोप केला आहे. बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये शुक्रवारी झालेल्या आंदोलनादरम्यान शेकडो लोक जखमी झाले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबराच्या गोळ्याही चालवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कट्टरपंथी मुस्लीम संघटनांनी चटगांव आणि ढाका इथं रस्त्यावर आंदोलन केलं होतं.

बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी मीही तुरुंगात गेलो होतो: PM मोदी

ढाका येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं. बांग्लादेशच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं. त्यावेळी मी 20-22 वर्षाचा असेल. त्यावेळी माझ्यासह माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मीही तुरुंगात गेलो होतो, असं मोदी म्हणाले होते. मोदींच्या या विधानानंतर विरोधकांकडून मोदींवर जोरदार टीकाही झाली. तसंच सोशल मीडियावर मोदींची खिल्लीही उडवण्यात आली.

संबंधित बातम्या :

बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्यासाठी मीही तुरुंगात गेलो होतो: PM मोदी

PM Modi Bangaladesh Visit : 497 दिवसानंतर मोदींचं विमान आकाशात झेपावलं, मोदी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर

Attacks on Hindu temples in Bangladesh by Muslim organizations after PM Narendra Modi’s visit

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.