AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan train hijack: पाकिस्तानमध्ये पूर्ण ट्रेनच हायजॅक, रेल्वेत लष्कर, ISI चे कर्मचारी, चकमकीत पाकिस्तानचे सहा सैनिक ठार

Train hijack in Pakistan: रेल्वेचे अपहरण केल्यानंतर बलोच आर्मीने महिला, मुले यांना सोडून दिले. माहितीनुसार, बीएलएची फिदायन युनिट, मजीद ब्रिगेड या मोहिमेचे नेतृत्व करत आहे. ज्यामध्ये फतेह पथक, एसटीओएस आणि गुप्तचर शाखा जिराब यांचा समावेश आहे.

Pakistan train hijack: पाकिस्तानमध्ये पूर्ण ट्रेनच हायजॅक, रेल्वेत लष्कर, ISI चे कर्मचारी, चकमकीत पाकिस्तानचे सहा सैनिक ठार
Train hijack in PakistanImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 12, 2025 | 7:29 AM
Share

Train hijack in Pakistan: पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसंदिवस गंभीर होत आहे. आता पाकिस्तानमधील बलोच आर्मीने संपूर्ण ट्रेनच हायजॅक केली. दशतवाद्यांनी रेल्वेतील 450 जणांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर रेल्वेत असणाऱ्या इतर सर्व प्रवाशांना सोडून देण्यात आले. परंतु 140 सैनिक, आयएसआय कर्मचारी आणि पोलिसांना ओलीस ठेवले आहे. त्यात आयएसआय आणि पाकिस्तानी लष्काराचे कर्मचारी आहेत. रेल्वेला अपहरणकर्त्यांकडून सोडवण्यासाठी गेलेल्या पाकिस्तानी लष्करातील सहा सैनिकांचा मृत्यू झाला आहे. सैन्य कारवाई केली तर प्रवाशांना ठार करण्यात येईल, असा इशारा बलोच आर्मीने दिला आहे.

ओलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) चे कर्मचारी आहेत. हे सर्वजण रजेवर पंजाबला जात होते. ट्रेनमध्ये उपस्थित सैनिकांनी कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास सर्व ओलीस ठार केले जातील, असा इशारा बीएलएने दिला आहे.

महिला अन् मुलांना सोडले

दरम्यान, रेल्वेचे अपहरण केल्यानंतर बलोच आर्मीने महिला, मुले यांना सोडून दिले. माहितीनुसार, बीएलएची फिदायन युनिट, मजीद ब्रिगेड या मोहिमेचे नेतृत्व करत आहे. ज्यामध्ये फतेह पथक, एसटीओएस आणि गुप्तचर शाखा जिराब यांचा समावेश आहे.

अशी केली ट्रेन हायजॅक

रेल्वे हायजॅक केल्यानंतर बलोचिस्तान लिबरेशन आर्मीने वक्तव्य दिले आहे. आमच्या सैनिकांनी आधी ट्रेनचे ट्रॅक बॉम्बने उडवले. त्यामुळे रेल्वे थांबली. रेल्वे थांबताच्या आमच्या सैनिकांनी ट्रेन संपूर्ण नियंत्रण घेतले. पाकिस्तानी लष्कर काही कारवाई करण्याचा विचार करत असेल तर ओलीस ठेवलेले  140 प्रवाशी वाचणार नाही.

बलोच आर्मीने पाकिस्तान लष्कराला गंभीर इशारा दिला आहे. आमच्याविरोधात लष्करी कारवाई केली तर त्याचे गंभीर परिणाम होतील. आमच्यावर हल्ला झाला तर सर्व  140 प्रवाशी मारले जातील. त्याची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानी लष्काराची असणार आहे.

पाकिस्तानात रेल्वे हायजॅक

काही दिवसांपूर्वी दिला होता इशारा

बलुचिस्तानमधील फुटीरतावादी संघटना अनेक दिवसांपासून पाकिस्तानविरोधात लढा देत आहेत. हा भाग अतिरेकी कारवायांचे केंद्र बनला आहे, जिथे पाकिस्तान सरकारवर सातत्याने हल्ले होत आहेत. काही दिवसांपूर्वी बलुच गटांनी पाकिस्तान आणि चीनविरोधात नव्याने हल्ला करण्याची घोषणा केली होती. बलुच गटाने अलीकडेच सिंधी फुटीरतावादी गटांसोबत युद्ध सराव पूर्ण केला होता.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.