AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा, बड्या देशाने दाखवला ठेंगा; ऐन युद्धात चिंता वाढली

Donald Trump : आणखी एका देशाने अमेरिकेला जबर दणका दिला आहे. मध्यपूर्वेकडे जाणाऱ्या एका विमानाला विमानतळावर उतरण्याची परवानगी नाकारली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा, बड्या देशाने दाखवला ठेंगा; ऐन युद्धात चिंता वाढली
Trump and meloniImage Credit source: Google
| Updated on: Mar 31, 2026 | 6:19 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या एका महिन्यापासून भीषण युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भीषण हल्ले होत आहेत. अशातच आता आणखी एका देशाने अमेरिकेला जबर दणका दिला आहे. मध्यपूर्वेकडे जाणाऱ्या एका विमानाला इटलीने सिसिलीमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली आहे. स्थानिक वृत्तपत्र कोरिएरे डेला सेराने याबाबत वृत्त दिले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, इटलीने स्वतःला इराण युद्धापासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारने डोनाल्ड ट्रंप यांच्या सरकारविरूद्ध घेतलेला हा पहिलाच निर्णय आहे. यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इटलीच्या निर्णयामुळे अमेरिकेला फटका

समोर आलेल्या माहितीनुसार, इटली सरकारने सिसिलीमध्ये अमेरिकन विमानांना लँडिंगची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या भागातील अमेरिकेच्या लष्करी कारवायांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण सिसिली मध्यपूर्वेतील मोहिमांसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. एक दिवस आधी स्पेननेही अमेरिकन विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. आता इटलीनेही लँडिंगची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या युद्धाला इटलीचा अमेरिकेला पाठिंबा नसल्याचे समोर आले आहे.

अमेरिका इटली मैत्री तुटली?

इटलीचा हा निर्णय अधिक महत्त्वाचा आहे, कारण इटली हा देश नाटोचा सदस्य आहे. युरोपमध्ये इटलीचा मोठा प्रभाव आहे. तसेच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे एकमेकांच्या जवळचे मानले जाते. मेलोनी या युरोपमधील एकमेव प्रमुख नेत्या होत्या, ज्यांना ट्रंप यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्यात व्हाइट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. याआधी अनेकदा मेलोनी यांनी ट्रंप यांना पाठिंबा दिला आहे. मात्र आता युद्धाच्या काळात विमान उतरण्यास नकार दिल्याने दोन्ही देशांमधील मैत्री तुटल्याचे समोर आले आहे.

इटलीने हा निर्णय का घेतला?

इटलीने अद्याप अधिकृतरीत्या या निर्णयावर भाष्य केलेले नाही. मात्र, हा निर्णय नुकत्याच झालेल्या जनमत चाचणीशी जोडला जात आहे. या चाचणीत मेलोनी यांच्या पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला होता. इराण युद्धामुळे पक्षाला हा फटका बसल्याचे बोलले जात आहे. सर्वेक्षणांत असे दिसून आले की, ट्रंप यांच्याशी मेलोनी यांच्या जवळिकीमुळे इटलीतील अनेक लोक नाराज आहेत. इराण युद्धामुळे देशात आर्थिक अडचणी निर्माण होण्याची भीती आहे. तसेच इटलीमध्ये पुढील वर्षी निवडणूक होणार आहे, त्यामुळे ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मेलोनी सरकारने अमेरिकन विमानांना उतरण्याची परवानगी नाकारली आहे.

Follow Us
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना