Donald Trump : जेलेंस्कींना अमेरिकेचा मोठा दणका, ट्रम्प विरोधात एका वक्तव्याची किंमत 5 लाख कोटी
Donald Trump : जेलेंस्की जास्त बोलले, तर ट्रम्प प्रशासन अजून कठोर पावल उचलेल असं सुद्धा म्हटलं जातय. डोनाल्ड ट्रम्प प्रशासन हळूहळू जेलेंस्की यांच्याविरोधात आक्रमक होत चाललय. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याविषयी निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

अमेरिकेत सत्तांतर झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ट्रम्प यांचा रशिया-युक्रेन युद्धाला विरोध आहे. त्यांच्या प्रशासनाने युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याविषयी निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या रशियासोबत वाटाघाटी सुरु आहेत. त्याचवेळी ते युक्रेनवर सुद्ध दबाव आणत आहेत. अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्रपती वोल्दोमीर जेलेंस्की यांना एका वक्तव्यावरुन घेरलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जेलेंस्की यांनी हे वक्तव्य केलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात वक्तव्य करण्याचा काही फायदा होणार नाहीय. युक्रेनने ट्रम्प यांचा म्हणणं ऐकून करार केला पाहिजे, असं अमेरिकेने म्हटलं आहे.
युक्रेन हे विसरतोय की, त्यांना अमेरिकेसोत 500 बिलियन डॉलर (जवळपास 5 लाख कोटी) रुपयाचा खनिज करार करायचा आहे, असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वाल्ट्ज यांनी म्हटलं आहे. हा पैसा शस्त्र आणि अन्य सहकार्यासाठी अमेरिका मागत आहे. जेलेंस्की यांच्याभोवती फास आवळणं, या दृष्टीने वाल्ट्ज यांच्या वक्तव्याकडे पाहिलं जात आहे. जेलेंस्की जास्त बोलले, तर ट्रम्प प्रशासन अजून कठोर पावल उचलेल असं सुद्धा म्हटलं जातय.
युक्रेनवर दबाव टाकताना ट्रम्प काय म्हणाले?
रशियासोबत तडजोड करण्यासाठी ट्रम्प सतत युक्रेनच्या राष्ट्रपतींवर दबाव टाकत आहेत. अलीकडेच ट्रम्प यांनी जेलेंस्कीला हुकूमशाह म्हटलं होतं. जेलेंस्की यूक्रेनमध्ये निवडणुका घेत नाहीयत. चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आहेत, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
जेलेंस्की-ट्रम्प शाब्दीक लढाई
जेलेंस्की अलोकप्रिय नेते असल्याचही ट्रम्प म्हणाले. दुसऱ्याबाजूला जेलेंस्की यांनी ट्रम्प विरोधात मोर्चा उघडताना खोट्या माणसांमध्ये बसणारा म्हटलं होतं. युक्रेन आणि रशियामध्ये लवकर शांतता करार करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. पण काही अटी-शर्तींमुळे अजूनही पेच फसलेला आहे.
युक्रेनला काय हवय?
रशियाने क्रिमियावर ताबा मिळवला ते क्षेत्र सुद्धा परत मिळवण्याचा युक्रेनचा प्रयत्न आहे. युद्धादरम्यान रशियाने जी क्षेत्र जिंकली आहेत, ती परत करावीत, अशी युक्रेनची मागणी आहे. युक्रेनला सैन्य अभ्यासावर कुठलेही प्रतिबंध नकोयत. पुढच्याकाळात रशियाने कुठलीही आक्रमक कृती करु नये ही सुद्धा युक्रेनची चिंता आहे.
