AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रिटीश F-35 विमानाचे जपानमध्ये इमर्जन्सी लँडिंग, कारण जाणून घ्या

भारतापाठोपाठ आता ब्रिटीश F-35B विमानाचे जपानमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. ब्रिटीश विमानवाहू युद्धनौका एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्समधून हे विमान जपानच्या जवळ गेले.

ब्रिटीश F-35 विमानाचे जपानमध्ये इमर्जन्सी लँडिंग, कारण जाणून घ्या
British F 35b Jet Image Credit source: ANI
| Edited By: | Updated on: Aug 11, 2025 | 3:08 PM
Share

ब्रिटीश एफ-35 विमानाच्या युद्धाभ्यासादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने जपानमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. हे ब्रिटीश विमान जपान आणि अमेरिकेसह अनेक देशांच्या संयुक्त युद्धाभ्यासात सहभागी झाले होते.

या युद्धाभ्यासादरम्यान ब्रिटीश विमानवाहू युद्धनौका एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्सयेथून या विमानाने उड्डाण केले. ब्रिटीश F-35 B विमानाच्या आपत्कालीन लँडिंगची ही दुसरी घटना आहे. याआधी जूनमहिन्यात आणखी एका F-35 B विमानाचे भारतात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते.

एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स विमानवाहू युद्धनौकेतूनही या विमानाने उड्डाण केले. हे विमान एक महिन्याहून अधिक काळ भारतात अडकून पडले होते आणि खूप मेहनतीनंतरच ते उड्डाणक्षम करण्यात आले होते.

कागोशिमा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

जपानच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑगस्ट रोजी सकाळी जपानच्या किरिशिमा शहरातील कागोशिमा विमानतळावर ब्रिटीश F-35 B लाइटनिंग 2 लढाऊ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून विमानतळावरील सामान्य कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. यूके डिफेन्स जर्नलच्या रिपोर्टनुसार, एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्सयेथून उड्डाण करताना इंजिनीअरिंगमध्ये बिघाड झाल्याने F-35 विमान आज जपानमधील कागोशिमा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळविण्यात आले. विमानाची तपासणी केली जात असून लवकरात लवकर कॅरियर स्ट्राईक ग्रुपकडे परत करण्यात येणार आहे.

पायलटने तांत्रिक बिघाडाची माहिती दिली

अहवालात कागोशिमा विमानतळ कार्यालयाने म्हटले आहे की, पायलटने संभाव्य तांत्रिक बिघाडाची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली होती. त्यानंतर स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेअकरानंतर F-35 B विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

एनएचके फुटेजमध्ये दुपारी दोन वाजता विमान धावपट्टीजवळ विनाअडथळा उभे असल्याचे दिसून आले. विमानतळ कार्यालयाने एनएचकेला सांगितले की, “लढाऊ वैमानिकाने आधीच एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला होता आणि सांगितले होते की त्याला संभाव्य तांत्रिक समस्येचा सामना करावा लागत आहे आणि आपत्कालीन लँडिंग करायचे आहे.”

जपानच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी

जपानच्या संरक्षण मंत्रालयाने पुष्टी केली की आपत्कालीन लँडिंग करणारे विमान एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्सचे ब्रिटिश वाहक-आधारित F-35 B होते, जे सध्या यूकेच्या कॅरियर स्ट्राइक ग्रुप 25 (CSJ 25) चा भाग म्हणून पश्चिम पॅसिफिकमध्ये तैनात आहे.

कागोशिमा विमानतळावर बिघाड झाल्याने विमान उतरले, असे मंत्रालयाने म्हटले आहे. एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स आणि त्यांच्यासोबत असलेली अनेक जहाजे या भागात जपान सेल्फ डिफेन्स फोर्सेस आणि अमेरिकन लष्करासोबत संयुक्त प्रशिक्षण घेत आहेत, ज्यांचा सराव 12 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. ही तैनाती ऑपरेशन हायमास्टचा एक भाग आहे, जे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मित्रराष्ट्रांशी जवळून काम करण्याची ब्रिटनची क्षमता दर्शविते.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.