AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बल्गेरियाचाही चीनला झटका, ड्रॅगनला बाजूला करत अमेरिकेशी 5G चा करार

बल्गेरियाने (Bulgaria) देखील बाल्कन क्षेत्रातील अन्य देशांप्रमाणेच चीनला झटका दिला आहे.

बल्गेरियाचाही चीनला झटका, ड्रॅगनला बाजूला करत अमेरिकेशी 5G चा करार
| Updated on: Oct 25, 2020 | 12:13 AM
Share

सोफिया : बल्गेरियाने (Bulgaria) देखील बाल्कन क्षेत्रातील अन्य देशांप्रमाणेच चीनला झटका दिला आहे. बल्गेरियाने या देशांप्रमाणेच 5 जी (5G deal) संबंधित करारात चीनला बाजूला करत अमेरिकेशी करार केला आहे. आपल्या क्षेत्रात चीनच्या कंपन्यांना शिरकाव करता येऊ नये म्हणून बल्गेरियाने हे पाऊल उचललं आहे. जागतिक पातळीवरील या निर्णयांमुळे चीनची मोठी अडचण होताना दिसत आहे (Bulgaria signs 5G deal with America US excluding chinese firms).

बल्गेरियाच्या आधी बाल्कनच्या उत्तरी मेसीडोनिया आणि कोसोवो अशा इतर देशांनी देखील चीनच्या कंपन्यांना दूर करत 5G साठी अमेरिकेशी करार केला आहे. बल्गेरियाने शुक्रवारी (24 ऑक्टोबर) ‘क्लीन नेटवर्क’ सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात चीनला एकटं पाडण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून 5जी करारातून चीनच्या कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

दरम्यान, याआधी भारताने देखील चीनला असाच झटका दिलाय. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर (India Ban 59 Chinese Apps) भारत सरकारने चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी घातली होती (America Looking At Banning Chinese Apps). त्यामुळे सर्वात प्रसिद्ध अशा Tik Tok, यूसी ब्राऊजर, शेअर इट सारख्या अनेक चिनी अ‍ॅप्सचा भारतातील व्यापार ठप्प झालाय. भारताच्या या निर्णयाचं अमेरिकेनेही स्वागत केलं होतं. आता अमेरिकेनेही चीनला मोठा झटका देण्याच्या तयारी सुरु आहे. अमेरिकाही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या विचारात आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी फॉक्स न्यूजला सांगितलं होतं, “अमेरिका चिनी सोशल मीडिया अ‍ॅप्सवर बंदी आणण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. यामध्ये Tik Tok चाही समावेश आहे.”

हेही वाचा :

चीनला आणखी एक झटका, भारतापाठोपाठ अमेरिकाही चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणण्याच्या तयारीत

चीनच्या वस्तूंमुळे अनेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका : अमेरिका

सुपरपॉवर अमेरिकेच्या गुप्त शस्त्रसाठ्यावर चीनचा डोळा, हल्ल्याच्या भीतीने अमेरिकाही सतर्क

हे पहिल्यांदा घडतंय : कोरोनाविषयी अमेरिका चीनची चौकशी करणार, दोषी आढळल्यास नुकसान भरपाईही घेणार

Bulgaria signs 5G deal with America US excluding chinese firms

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.