Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट, भारताशी मैत्री करायला कॅनडाचा ‘प्लॅन इंडिया’ समोर!
कॅनडा भारतासोबतचे संबंध सुधारावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. या देशाला अमेरिकेवरील अवलंबित्त्व कमी करायचे आहे. असे असतानाचा कॅनडाचा इंडिया प्लॅन समोर आला आहे.

India Canada Relations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलेला आहे. याच कारणामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडलेले आहेत. ट्रम्प अजूनतरी हा टॅरिफ कमी करण्याची शक्यता नाही. त्यामुळेच भारत आपल्या व्यापारविस्तारासाठी नव्या देशांची बाजारपेठ शोधत आहे. तसेच आत्मनिर्भतेवर भारताचा जोर आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी इतरही अनेक देशांबाबत अशाच प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत. कॅनडा या देशानेदेखील आपला इंडिया प्लॅन आखला आहे. कॅनडाच्या या नियोजनामुळे अमेरिकेचा चांगलाच जळफळाट होऊ शकतो.
भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधात प्रगती
कॅनडा भारताशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तशी माहितीच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दिली आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधात प्रगती होत आहे, असे मार्क कार्नी म्हणाले आहेत. दक्षिण कोरियाच्या ग्योंगजू येथे पत्रकारांशी बोलताना कार्नी यांनी हे भाष्य केले आहे.
कॅनडाचा नेमका प्लॅन काय?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य परिषदेत सहबागी झालेले नाहीत. मात्र तरीदेखील कार्नी यांनी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद तसेच अन्य मंत्र्यांनी भारताच्या समकक्ष नेत्यांशी चर्चा केल्याचे सांगितले. भारत आणि कॅनडा यांच्यातील भागिदारी वृद्धींगत व्हावी, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य वाढावे, अमेरिकेवरील आमचे अवलंबित्त्व कमी व्हावे यासाठी आमचा प्रयत्न असल्याचेही कार्नी यांनी सांगितले.
कॅनडा नेमका काय प्रयत्न करतोय?
कॅनडाला अमेरिका वगळून अन्य देशांसोबतची निर्यात थेट दुप्पट कराची आहे. त्यासाठी कॅनडाचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळेच कॅनडातील नवे सरकार भारतासह प्रशांत क्षेत्राशी निगडीत असलेल्या देशांना सोबत घेऊन कॅनडातील मजूर तसेच उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट
दरम्यान, कार्नी यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेपुढे वेगळे आव्हान उभे राहू शकते. भारत, चीन तसेच अन्य देशांची कोंडी करण्यासाठी अमेरिका वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करत आहेत. ट्रम्प यांचा पवित्रा लक्षात घेता इतर देश सतर्क झाले आहेत. याच भूमिकेतून कॅनडा भारताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे अमेरिकेचा जळफळाट होऊ शकतो. त्यामुळेच आता डोनाल्ड ट्रम्प नेमकी कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
