चीनचा पाकिस्तानला मोठा धक्का; घेतला मोठा निर्णय, मित्र राष्ट्राचा टप्प्यात आणून कार्यक्रम
चीनने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे, आपल्या सैन्याची ताकद वाढवण्याच्या पाकिस्तानच्या स्वप्नावर चीनच्या या निर्णयामुळे पाणी फिरलं आहे.

चीनने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे, आपल्या सैन्याची ताकद वाढवण्याच्या पाकिस्तानच्या स्वप्नावर चीनने पाणी फिरवलं आहे. चीनने पाकिस्तानला केवळ हायपरसॉनिक मिसाईल देण्यास नकारच दिला नाही तर त्याचं तंत्रज्ञान ट्रान्सफर करण्यास देखील स्पष्ट नकार दिला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चीनने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की, हायपरसॉनिक मिसाईलची निर्यात होणार नाही, तसेच त्याचं तंत्रज्ञान ट्रान्सफर देखील होणार नाही.
पाकिस्तानची गेल्या अनेक वर्षांपासूनची अशी इच्छा आहे की चीनने आपल्याला हायपरसॉनिक मिसाई द्याव्यात, या मिसाईल उलब्ध झाल्यास आपल्याला भारताचा सामना करता येईल, परंतु चीनने पाकिस्तानच्या या आशेवर झटक्यात पाणी फिरवलं आहे, चीनने पाकिस्तानला आपल्या या मिसाईल देण्यास नकार दिला आहे. तसेच या मिसाईलचं तंत्रज्ञान देण्यास देखील नकार दिला आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
भारताने हायपरसॉनिक मिसाईल,बॅलिस्टिक मिसाईल, सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आणि हायपरसॉनिक टेक्नोलॉजी डेमॉन्सट्रेटर व्हेकल सारखे उच्च तंत्रज्ञान असलेली शस्त्र विकसीत केली आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं ब्रह्मोस मिसाईलचा वापर केला होता, या मिसाईलची ताकद पाहून पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. आपल्याही भात्यामध्ये अशीच मिसाईल हवी अशी पाकिस्तानची इच्छा आहे, मात्र चीनने सध्यातरी पाकिस्तानच्या या इच्छेला ब्रेक लावला आहे.
आम्ही आमच्या या मिसाईलच्या तंत्रज्ञानाला सिक्रेट ठेवू इच्छितो, असं चीनने म्हटलं आहे. मात्र यामागे हे देखील कारण असू शकतं की चीनला अशी भीती वाटत आहे, की हे मिसाईल पाकिस्तानच्या हातात पडलं तर पश्चिमेकडील देश या मिसाईलचा अभ्यास करतील आणि यासारखंच दुसरं तंत्रज्ञान विकसीत करतील, त्यामुळे हे मिसाईल चीनेने पाकिस्तानला देण्यास नकार दिला आहे.
यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे, कारण आता पाकिस्तानची ही इच्छा पूर्ण होणार नाहीये, गेल्या अनेक दिवसांपासून चीनचं हे मिसाईल आपल्याला मिळावं यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र चीनच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या या स्वप्नाला सुरूंग लागला आहे.
