China on PM Modi Leh Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह-लडाख दौऱ्यावर चीनची पहिली प्रतिक्रिया

इतिहास साक्षी आहे विस्तारवाद नेहमीच नष्ट झाला आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी लडाख दौऱ्यात विस्तारवादावर भाष्य करत चीनला इशारा दिला. (Chinese Foreign Ministry reaction on PM Narendra Modi Ladakh visit)

China on PM Modi Leh Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह-लडाख दौऱ्यावर चीनची पहिली प्रतिक्रिया

बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लडाख दौऱ्यानंतर चीन गोंधळून गेला आहे. भारत आणि चीनमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी माध्यमांद्वारे तणावाचं वातावरण कमी करण्याबाबत संवाद आणि वाटाघाटी सुरु आहेत. कोणत्याही पक्षाने असे काही करु नये, जेणेकरुन इथली तणावाची परिस्थिती आणखी बिघडेल, असे वक्तव्य चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन यांनी केलं. (China Foreign Ministry reaction on PM Narendra Modi Ladakh visit)

भारत-चीन सीमेवर सुरु असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (3 जुलै) लडाखला भेट दिली. पंतप्रधान मोदींनी लष्कर, वायुसेना आणि इंडो तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) जवानांशी संवाद साधला. मोदींनी गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. पंतप्रधान मोदींसोबत मुख्य संरक्षण सचिव CDS बिपीन रावतदेखील लेह दौऱ्यावर आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असताना थेट पंतप्रधान तिथे पोहोचल्याने भारताची आक्रमक भूमिका दिसून येत आहे.

थेट पंतप्रधानांनी सीमा भागात केलेला दौरा भारतीय जवानांचे मनोधैर्य वाढवणारा तर आहेच, मात्र चीनची पाचावर धारण बसणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी विस्तारवादावर भाष्य करत चीनला इशारा दिला. इतिहास साक्षी आहे विस्तारवाद नेहमीच नष्ट झाला आहे किंवा त्याला झुकावं लागलं आहे. आज देखील संपूर्ण जग या विस्तारवादाच्या विरोधात एक झाल्याचं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.

“विस्तारवादाचं युग संपलेलं आहे. हे युग विकासवादाचं आहे. वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीत विकासवादच योग्य आहे. यासाठीच भविष्यात संधी आहेत. विकासच भविष्याचा आधार आहे. मागील शतकांमध्ये विस्तारवादानेच मानवतेचं सर्वात जास्त नुकसान केलं, मानवतेला संपवण्याचा प्रयत्न केला. विस्तारवादाचं भूत ज्याच्या मानगुटीवर बसतं, तो नेहमीच जागतिक शांततेसाठी धोका बनला आहे.” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“मानवतेच्या प्रगतीसाठी शांतता आणि मित्रत्व महत्त्वाचे आहे. मात्र कमकुवत लोक शांतता कधीच आणू शकत नाहीत, हे आम्हाला माहिती आहे. शूरपणा हीच शांततेची पूर्वअट आहे. भारत हा जमीन, पाणी, आकाश आणि अंतराळात आपली शक्ती वाढवत आहे. यामागे मानव कल्याण हाच हेतू आहे. भारत आज आधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती करत आहे. जगातील आधुनिक तंत्रज्ञान भारतीय सैन्यासाठी आणलं जात आहे. यामागे भारताला सशक्त करणं, शांतता आणणं हाच उद्देश आहे” असं मोदींनी नमूद केलं.

हेही वाचा :

जवानांच्या हातात देश सुरक्षित, जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन, लडाखमध्ये पंतप्रधान मोदींचे जवानांना नमन

PM Modi in Leh | पंतप्रधान मोदींचा अचानक लेह दौरा, जवानांना सातवी ‘सरप्राईझ’ भेट

PM Modi in Leh | पंतप्रधानांचा लेह-लडाख दौरा, नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे 10 महत्त्वाचे मुद्दे

PM Modi in Leh | पंतप्रधान मोदी अचानक लेह-लडाखमध्ये, कुणालाही कानोकान खबर नाही

(China Foreign Ministry reaction on PM Narendra Modi Ladakh visit)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *