China-Russia : भारताच्या विश्वासू मित्राविरोधात चीन-रशिया आले एकत्र? पुतिन यांनी डायरेक्ट स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स उतरवले, आपणं कोणाच्या बाजून जाणार?
China-Russia : चीन आणि रशिया या दोन जगातील दोन मोठ्या शक्ती आहेत. हे दोन्ही देश एका छोट्या देशाविरुद्ध एकत्र आले आहेत. त्यातून तणाव वाढला आहे. महत्वाचं म्हणजे चीन-रशिया मिळून ज्या देशाविरोधात हे सर्व करतायत, तो देश भारताचा खूप चांगला मित्र आहे. म्हणून भारताची भूमिका सु्द्धा महत्वाची असेल.

आशिया खंडात तणाव वाढला आहे. दोन मोठे देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. फायटर जेट्सची उड्डाणं सुरु झाली आहे. युद्धनौकांनी गस्ती सुरु केल्या आहेत. सध्या पेट्रोलिंगमधून इशारे सुरु आहेत. पण एखादी चुकीची कृती युद्धाचा वणवा पेटवण्यासाठी पुरेशी ठरु शकते. मागच्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदींनी पुतिन यांचं स्वागत सफेद टोयोटा फॉर्च्यूनर कारने केलं होतं. टोयोटा ही जपानी कार कंपनी आहे. पुतिन यांनी आता थेट जापान विरोधात भूमिका घेतली आहे. मागच्या काही दिवसांपासून चीन आणि जापानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांकडून आक्रमकता सुरु आहे. त्यात आता थेट रशियाने भूमिका घेतली आहे.
रशियाने पेट्रोलिंगसाठी सक्षम असलेली विमानं चिनी सैन्याच्या समर्थनात उतरवली आहेत. रशियाने चीनसोबत मिळून जापानला स्पष्ट संदेश दिला आहे. जापानच्या संरक्षण मंत्रालयानुसार मंगळवारी रात्री उशिरा रशिया आणि चिनी एअरफोर्सने जापानच्या चारही बाजूला जॉइंट लॉन्ग रेंज पेट्रोलिंग केली. रशियाची दोन Tu-95 न्यूक्लियर-केपेबल स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स जपान जवळच्या समुद्रातून पूर्व चीनच्या समुद्रात पोहोचली. तिथे चीनचे दोन H-6 बॉम्बर्स या मिशनमध्ये सहभागी झाले. त्यानंतरही चारही विमानांनी संयुक्तरित्या प्रशांत महासागरात उड्डाण केलं.
भारताची यामध्ये काय भूमिका असेल?
चीन आणि जपानमध्ये तणाव निर्माण झालेला असताना रशियाने थेट भूमिका घेतली आहे. आता भारताची यामध्ये काय भूमिका असेल? कारण यातल्या दोन देशांसोबत भारताची घनिष्ट मैत्री आहे. रशिया आणि जपान. जपानने भारताच्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्याशिवाय दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध देखील मजबूत आहेत. भारताच्या वाहन उद्योग क्षेत्रात जपानी कंपन्यांचं मोठ प्रस्थ आहे.
व्यापाराला चालना देणारे निर्णय
दुसरीकडे रशियासोबत भारताचे दृढ मैत्रीसंबंध आहेत. भारताच्या संरक्षण क्षेत्रात रशियाची मोठी भूमिका आहे. 60 च्या दशकापासून रशिया भारताला रायफल्स, फायटर जेट्स, रणगाडे याचा पुरवठा करत आला आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी रशियाच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टिमने निर्णायक भूमिका बजावली होती. भविष्यातही भारताला रशियाकडून महत्वाचं संरक्षण तंत्रज्ञान मिळणार आहे. नुकतेच दोन्ही देशांमध्ये संरक्षणाव्यतिरिक्त व्यापाराला चालना देणारे निर्णय घेण्यात आले आहेत.
चीन हा भारताचा मित्र नाहीय, पण….
चीन हा भारताचा मित्र नाहीय. भारतासोबत नेहमीच शत्रू सारख वागत आलाय. पण मागच्या काही महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारत-चीनमधील संबंध सामान्य झाले आहेत. भारताचा चीनसोबत व्यापारही खूप मोठा आहे. अलीकडे भारतातून चीनला होणाऱ्या सामानाच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. त्यामुळे चीन-जपान या दोन देशांमधील तणावात भारत थेट कुठल्या एका देशाच्या बाजूने जाण्याची भूमिका घेणार नाही. रशिया-युक्रेन युद्धाप्रमाणेच भारताची भूमिका तटस्थतेची असू शकते. कारण या तणावात जे तीन मोठे प्लेयर आहेत, रशिया-चीन-जपान या तिन्ही देशांसोबत भारताचे मजबूत व्यापारिक संबंध आहेत.
