AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनने पाकिस्तानला खडसावलं, थेट सैन्यदल पाठवण्याची धमकी! ड्रॅगनचा गेम प्लान समजून घ्या

चीन आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षात बऱ्यापैकी चांगले आहेत. त्यामुळे चीनने पाकिस्तानात गुंतवणूक केली आहे. मोठे मोठे प्रकल्प पाकिस्तानात चीनच्या कृपेने सुरु आहेत. पण असं असलं तरी ड्रॅगनला विकासकामात अडथळा येत आहे. त्यामुळे थेट सैन्यदल पाठवण्याची धमकी दिली आहे.

चीनने पाकिस्तानला खडसावलं, थेट सैन्यदल पाठवण्याची धमकी! ड्रॅगनचा गेम प्लान समजून घ्या
चीनने पाकिस्तानला खडसावलं, थेट सैन्यदल पाठवण्याची धमकी! ड्रॅगनचा गेम प्लान समजून घ्याImage Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 04, 2025 | 9:09 PM
Share

चीनने मागच्या काही वर्षात झपाट्याने विकास केला असून आर्थिक महासत्ता म्हणून एक दरारा निर्माण केला आहे . अमेरिका, रशियानंतर चीनने जगात आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. पण भारत आणि चीनचे संबंध काही चांगले नाहीत. अनेकदा सीमेवरून वाद झाला आहे. चर्चा होत असली तरी त्यात तसा काही ओलावा दिसत नाही. दुसरीकडे, भारताचा शत्रू तो आपला मित्र अशा रणनितीवर चिनी ड्रॅगन काम करत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात चीनने पाकिस्तानसोबत जवळीक साधली आहे. पाकिस्तान हा देश भिकेला लागलेला असताना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. तसेच मोठमोठे प्रकल्प पाकिस्तानात चीनच्या कृपेने सुरु आहे. मात्र असं सर्व होत असताना चिनी ड्रॅगनला देखील पाकिस्तानातील दहशतवादाचा अडसर आहे. पाकिस्तानातील शहबाज सरकार चीनच्या नागरिकांना सुरक्षा पुरवण्यात असमर्थ ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी SCO समिटमध्ये पाकिस्तानला खडे बोल सुनावले.

जागतिक बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) प्रकल्पांमध्ये पाकिस्तान हा एक केंद्रबिंदू आहे. पण या प्रकल्पांवर काम करणाऱ्या चिनी नागरिकांसाठी सुरक्षा धोक्यात आहे. त्यामुळे दोन जवळच्या मित्र राष्ट्रांमधील तणावाचे कारण बनले आहे. चीनने हे प्रकरण उचलून धरलं. SCO समिटमध्ये पाकिस्तानवर पुरेपूर दबाव टाकला. चिनी नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध केला. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, “चीन दहशतवादाविरुद्धच्या पाकिस्तानच्या लढाईला पाठिंबा देतो आणि पाकिस्तानमधील चिनी कर्मचारी, प्रकल्प आणि संस्थांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि द्विपक्षीय सहकार्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पाकिस्तान प्रभावी उपाययोजना करेल अशी आशा करतो.”

दुसरीकडे, पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शी यांच्यासोबतच्या भेटीचा उल्लेख करण्यात आला आहे. पण सुरक्षेच्या मुद्द्याचा उल्लेख मात्र जाणीवपूर्वक टाळला आहे. पाकिस्तान सरकार चिनी प्रकल्प आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हजारो लष्करी तुकड्या, निमलष्करी दल आणि पोलिस तैनात केले आहेत. पण त्याचा फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे वाढत्या हल्ल्यामुळे चीनला पाकिस्तानात आपले सुरक्षा दल तैनात करायचे आहे. चीन त्या दृष्टीने पाकिस्तानवर दबाव टाकत असल्याचं दिसत आहे. भविष्यात चिनी सैनिक पाकिस्तानात दिसले तर आश्चर्य वाटायला नको.

राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.