डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, एकतर्फी निर्णय नाहीच…, या देशाचा धक्का…
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा बॉम्ब भारतावर टाकलेला असताना आता भारताकडून मोठा डाव रचला जातोय. डोनाल्ड ट्रम्प यांना सडेतोड उत्तर देण्याचा भारताचा प्लॅन आहे. आता भारताच्या समर्थनार्थ अजून एक देश मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय.

भारत आणि अमेरिकेत टॅरिफच्या मुद्द्यावर वातावरण तापले असताना चीनने या वादात उडी घेतल्याचे बघायला मिळतंय. चीनचे परराष्ट्र मंत्री तीन दिवसीय भारत दाैऱ्यावर आहेत. वांग यी हे 18 ते 20 ऑगस्ट 2025 दरम्यान भारतात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही ते भेट घेणार आहेत. आता नुकताच त्यांनी अमेरिकेला झटका देणारे मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारतावर टॅरिफच्या मुद्यावरून दबाव टाकण्याचे काम करत आहेत. हेच नाही तर पाकिस्तानच्या आडून धमक्या देत आहेत. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत, कारण याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल.
आता नुकताच चीनचे परराष्ट्र मंत्री यांनी म्हटले की, जग बदलत आहे आणि या बदलासोबतच एकतर्फी निर्णय देण्याचे प्रमाण वाढले असून तो एक ट्रेंड वाढत आहे. पण हे आता चालणार नाही. मुक्त व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. कारण मानवता जगाचे भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचली आहे. अप्रत्यक्षपणे वांग यी यांनी अमेरिकेवर निशाणा साधला.
त्यांनी थेट म्हटले की, एकतर्फी धमक्या चालणार नाहीत. हा चुकीचा ट्रेंड पुढे भविष्यात चालणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेकडून भारताला सातत्याने धमकावले जात आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफ लावला नाही. चीनला 90 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. शिवाय चीनच्या टॅरिफच्या मुद्द्यावरून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. टॅरिफच्या मुद्दा तापलेला असतानाच चीनचे परराष्ट्र मंत्री हे भारताच्या दाैऱ्यावर पोहोचल्याने याला अधिक महत्व प्राप्त झाले असल्याचे दिसतंय.
आज चीनचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत महत्वाची बैठक पार पडणार आहे. याशिवाय टॅरिफच्या मुद्द्यावरून चीनने भारताची साथ दिल्याचे बघायला मिळाले.डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांनी नरेंद्र मोदी यांना फोन केला. यामध्ये टॅरिफच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये संभाषण झाल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
