पाकिस्तानमध्ये रेल्वेत भीषण स्फोट, 65 प्रवाशांचा मृत्यू, अनेकांच्या धावत्या रेल्वेतून उड्या

पाकिस्तानात कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसमध्ये (Karachi-Rawalpindi Tezgam express fire) भीषण स्फोट झाला.

पाकिस्तानमध्ये रेल्वेत भीषण स्फोट, 65 प्रवाशांचा मृत्यू, अनेकांच्या धावत्या रेल्वेतून उड्या

इस्लामाबाद : पाकिस्तानात कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसमध्ये (Karachi-Rawalpindi Tezgam express fire) भीषण स्फोट झाला. या स्फोटात तब्बल 65 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी आहेत. पाकिस्तानातील (Karachi-Rawalpindi Tezgam express fire) पंजाब प्रांताच्या दक्षिणेस रहीम यार खान परिसरात गुरुवारी ही दुर्घटना घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जेवण बनवणाऱ्या पँट्री कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या अपघातातील जखमींवर मुल्तान परिसरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपायुक्तांच्या देखरेखीखाली बचावकार्य वेगाने सुरु आहे.

धावत्या रेल्वेतून अनेकांच्या उड्या

मिळालेल्या माहितीनुसार, पँट्री कारमध्ये आग लागल्यानंतर रेल्वेचे दोन डबे आगीने व्यापले. आग हळूहळू वाढत गेली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गदारोळ झाला. काहींनी आगीपासून वाचण्यासाठी धावत्या ट्रेनमधून खाली उड्या मारल्या.

सिलेंडर स्फोटाने आग

पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशीद यांनी दिलेल्या माहितीनुसार, “एका सिलेंडर स्फोटामुळे संपूर्ण रेल्वे आगीच्या भक्षस्थानी गेली. प्रवासी सकाळी नाश्त्याची तयारी करत होते, त्यावेळी आग पसरली. बघता बघता आग पसरल्याने, काही प्रवाशांनी थेट रेल्वेतून उड्या मारल्या. ही ट्रेन कराचीवरुन रावळपिंडीला जात होती.”

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *