AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा! किती धोकादायक हा आजार, त्यावर उपचार काय?

Donald Trump Health Update : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोग्य अहवाल समोर आला आहे. त्यांना नस, शिरांसंबंधीचा आजार 'क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी' झाला आहे. हा आजार किती धोकादायक आहे? त्याची लक्षणं तरी काय?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा! किती धोकादायक हा आजार, त्यावर उपचार काय?
डोनाल्ड ट्रम्पImage Credit source: गुगल
| Updated on: Jul 19, 2025 | 1:25 PM
Share

जगातील सर्वात चर्चित चेहरा म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. पण सध्या ते एका आजाराने त्रस्त झाले आहेत. त्यांच्या आरोग्यविषयक अहवालाने सध्या अमेरिकेत खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांना नेमकं झालं तरी काय? त्यांना शिरांसंबंधीचा कोणता आजार झाला आहे याची चर्चा होत आहे. त्यांना शिरांसंबंधीचा आजार ‘क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी’ झाला आहे. हा आजार किती धोकादायक आहे? त्याची लक्षणं तरी काय?

काय आहे हा आजार?

डॉ. नवीन शर्मा यांनी ‘क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी’ या आजाराविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, या आजारात पायांच्या नसा, शिरा या हृदयाकडे रक्त योग्यरित्या परत पाठवू शकत नाही. सामान्यतः नसांमध्ये झडपा असतात, ज्यामुळे रक्त फक्त एकाच दिशेने वाहू शकते. पण असा आजार झाला तर रक्तवाहिन्यातील झडपा कमकुवत होतात. त्या योग्य रित्या काम करत नाही. परिणामी पायांमध्ये रक्त साचू लागते. मग पायांना सूज, वेदना आणि इतर समस्या उद्भवतात.

क्रॉनिक व्हेनस इन्स्युफिशियसीची लक्षणं काय?

  1. आजारात पायात सतत जडपणा, थकवा जाणवतो
  2. पायाचे घोटे आणि मांड्यांमध्ये सूज येते
  3. पायाची त्वचा काळपट-तपकिरी रंगाची दिसते
  4. त्वचेला खाज सुटते, जळजळ होते
  5. जास्तवेळ उभं राहिल्यास मग वेदना होतात
  6. पायाला जखम झाल्यास ती भरण्यासाठी अधिक वेळ लागतो

हा आजार धोकादायक आहे का?

हा आजार जीवघेणा नाही. पण त्यामुळे व्यक्ती अस्वस्थ नकी होतो. वेळेवर त्याचा इलाज, त्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे. उपचार न घेतल्यास दैनंदिन व्यवहारात व्यक्तीला खूप त्रास होतो. पायात सातत्याने वेदना, सूज आणि चालताना त्रास होतो. भयंकर वेदनेने व्यक्ती तळमळतो. त्यामुळे शारीरिकच नाही तर मानसिकही त्रास वाढतो.

या आजारावर इलाज काय?

क्रॉनिक व्हेनस इन्स्युफिशियवर उपचार शक्य आहे. नस, शिरासंबंधीच्या या आजारावर उपचार करता येतात. या आजाराचा त्रास किती आहे, त्यानुसार इलाज करण्यात येतो.

जीवनशैलीतील बदल करा : वजन नियंत्रित करा, दररोज चालत रहा आणि एकाच स्थितीत जास्त वेळ बसणे किंवा उभे राहणे टाळा.

कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज : यामुळे पायांमध्ये रक्तप्रवाह नियंत्रित करण्यास मदत होते.

औषधं काय : सूज आणि वेदना कमी करण्यासाठी काही औषधे दिली जातात.

लेसर अथवा शस्त्रक्रिया: जर स्थिती गंभीर असेल तर लेसर उपचार अथवा शस्त्रक्रिया असे उपाय केले जाऊ शकतात.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.