डोनाल्ड ट्रम्प यांचं मी पुन्हा येईन, अध्यक्षपदाची पुढील निवडणूक लढणवण्याचे संकेत

डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी बायडन यांचे प्रशासन नोकरीविरोधी आणि विज्ञान विरोधी असल्याचा आरोप केला. (Donald Trump Joe Biden)

डोनाल्ड ट्रम्प यांचं मी पुन्हा येईन, अध्यक्षपदाची पुढील निवडणूक लढणवण्याचे संकेत
डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार सोडल्यानंतर प्रथमच जाहीर कार्यक्रमात सहभाग घेतला. ट्रम्प यांनी या कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यावर टीकास्त्र सोडले. कन्झर्वेटिव पॉलिटिकल अ‌ॅक्शन कॉन्फरन्समध्ये भाग घेत 2024 च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत त्यांनी दिले. अमेरिकेत 2024 मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प नव्या पक्षासह सहभागी होऊ शकतात. मात्र, त्यांनी रिपब्लिक पक्षाला एकजूट कायम राखण्याचं आवाहन केले. (Donald Trump slams Joe Biden in public programme at Florida)

जो बायडन प्रशासनावर टीका

डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी बायडन यांचे प्रशासन नोकरीविरोधी आणि विज्ञान विरोधी असल्याचा आरोप केला. फ्लोरिडामधील ओरलँडोमध्ये आोयजित सीपीएसीच्या वार्षिक सत्रात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अध्यक्ष होण्याचा मानस बोलून दाखवला. पुन्हा एकदा सिनेटमध्ये विजय मिळवू आणि रिपब्लिकन उमेदवार अध्यक्षपदाची निवडणूक जिंकेल, असं ते म्हाले. ट्रम्प यांनी 90 मिनिटांच्या भाषणादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार बायडन यांच्यावर टीका केली.”आम्ही डेमोक्रॅटिक पक्षापेक्षा जास्त प्रभावशाली आणि शक्तीशाली आहोत. येत्या वर्षांमध्ये रिपब्लिकन पक्ष अमेरिकेच्या स्वातंत्र्याला पुढे घेऊन जाईल. बायडन प्रशासन देशाचं धोरण समाजवादी पद्धतीनं राबवत आहे. त्यांना त्या मार्गावर जाऊ देणार नाही. बायडन यांच्या 40 दिवसांच्या कार्यकाळाला रोजगारविरोधी, कुटुंब विरोधी, सीमा विरोधी,ऊर्जा विरोधी, महिला विरोधी आणि विज्ञान विरोधी असल्याची टीका केली.

डोनाल्ड ट्रम्प यांचे मी पुन्हा येईन?

2024 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार अध्यक्षपदी विजयी होईल मात्र, तो कोण असेल, असं ट्रम्प म्हणाले. अध्यक्षपदाची पुढील निवडणूक लढवण्याबद्दल ट्रम्प यांनी स्पष्टपणे निवडणूक लढण्याबाबत वक्तव्य केलं नसले तरी त्यांनी याबाबत संकेत दिले.

ट्रम्प यांच्याकडून विजयाचा परत एकदा विजयाचा दावा

केवळ एका महिन्यात अमेरिका पहिल्या स्थानावरुन शेवटच्या स्थानावर पोहोचली आहे. बायडन यांनी अवैध प्रवासी नागरिकांसाठी देशांच्या सीमा खुल्या केल्याचा आरोप देखील त्यांनी केला. नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला. त्यानिवडणुकीत विजय मिळवल्याचा दावा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे.

संबंधित बातम्या:
Donld Trump | खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा जो बायडन यांना झटका, सरकारी विमान प्रवास नाकारला

नरेंद्र मोदी जो बायडन यांच्यात फोनवरुन चर्चा; भविष्यातील वाटचालीचा अजेंडा ठरला

(Donald Trump slams Joe Biden in public programme at Florida)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI