डोनाल्ड ट्रम्प यांचा जावई मदतीला धावून, इस्रायल-हमास युद्धाबंदीचा पहिला टप्पा यशस्वी करण्यासाठी महत्वाची भूमिका, थेट इजिप्तमधून..
डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल आणि हमास यांच्या युद्धाबाबत अत्यंत मोठी घोषणा केली. या दोन देशांमधील युद्ध थांबवण्यासाठी ते सतत प्रयत्न करताना दिसले. युद्धबंदीचा पहिला टप्पा दोन्ही देशांनी मान्य केल्याचे त्यांनी म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून इस्रायल आणि हमास या दोघांनीही गाझा शांतता प्रस्ताव अमेरिकेचा मान्य केला. या प्रस्तावातील पहिल्या टप्प्याला सहमती दर्शवली आहे. हमासने हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी मोठा वेळ घेतला. शेवटी अमेरिकेच्या दबावानंतर त्यांनी प्रस्तावावर सही केली. या युद्धामध्ये गाझा पट्टीचे अत्यंत मोठे नुकसान झाले असून तब्बल पुढील 25 वर्ष तेथील जमिनीवर शेती करता येणार नाही, जास्त करून लोक बेघर असून या युद्धात त्यांचे घर राहिली नाहीत. गाझा संघर्षाच्या दोन वर्षांनंतर युद्धबंदीच्या दिशेने मोठे पाऊस उचलण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली. हेच नाही तर यादरम्यान ट्रम्प यांनी कतार, तुर्की आणि इजिप्तचे आभार मानले. या तिन्ही देशांनी देखील या युद्धबंदीसाठी मध्यस्थी केली.
या कराराअंतर्गत, हमास सर्व ओलिसांना सोडेल दुसरीकडे इस्त्रायल देखील आपले सैन्य सहमतीने मागे घेईल. 20 कलमी प्रस्तावातील हा पहिला टप्पा आहे, जो दोन्ही देशांनी मान्य केला. या युद्धाची सर्वाधिक झळ गाझा पट्टीतील लोकांना सहन करावी लागली. पुढील काही वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत संघर्षाची ठरणार आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, मला खरोखरच आनंद होतोय की, हमासने या करारवर सही केली.
हमासने देखील आपण करारावर सही केल्याचे मान्य केले. या करारानुसार, इस्रायलींनी एन्क्लेव्हमधून माघार घेईल. हेच नाही तर दोन्ही देश ओलिस ठेवलेल्या लोकांची देवाणघेवाण करतील. इस्रायलने युद्धबंदीची पूर्णपणे अंमलबजावणी करावी याची खात्री करण्याचे आवाहन हमासने केले आहे. इजिप्तमधील चर्चेनंतर हमासने अखेर हा प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय घेतला.
ट्रम्प यांनी त्यांचे जावई जेरेड कुशनर आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांना पाठवले होते. इस्रायलचे प्रतिनिधित्व इस्रायली धोरणात्मक व्यवहार मंत्री रॉन डर्मर यांनी केले, जे नेतान्याहू यांचे जवळचे विश्वासू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ओलिस ठेवलेल्यांची सूटका शनिवारी होण्याची शक्यता आहे. नेतान्याहू आणि ट्रम्प यांनी फोनवरून संवाद साधला आणि एकमेकांचे अभिनंदन केल्याचीही माहिती मिळतंय. ट्रम्प यांच्या जावयाने हे युद्ध रोखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
