AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा शाही थाट, हवाय सोन्याचा नळ, सोन्याचा आरसा, लिंकन बाथरुममुळे अडचण वाढली!

सध्या अमेरिकेतील जनता शटडाऊनमुळे त्रस्त आहे. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र एक मोठा निर्णय घेतला आहे. व्हाईट हाऊसच्या सौंदर्यीकरणासाठी ते लाखो डॉलर्स खर्च करत आहेत.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा शाही थाट, हवाय सोन्याचा नळ, सोन्याचा आरसा, लिंकन बाथरुममुळे अडचण वाढली!
donald trump
| Updated on: Nov 01, 2025 | 9:49 PM
Share

Donald Trump : साधारण एका महिन्यापासून अमेरिकेत शटडाऊन आहे. या शटडाऊनमुळे अनेक सरकारी नोकरांना त्यांची नोकरी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सोबतच सरकारी कामांसाठी निधीची कमतरता भासत आहे. लवकरात लवकर शटडाऊन हटवावे अशी मागणी केली जात आहे. एकीकडे सामान्य जनता, सरकारी नोकरी या शटडाऊनमुळे चिंताग्रस्त असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र वेगळ्याच दुनियेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या व्हाईट हाऊस या शासकीय घराची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी तब्बल 300 दशलक्ष डॉलर्सचा खर्च होणार आहे. ट्रम्प यांच्या याच भूमिकेवर आता माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी सडकून टीका केली आहे.

कमला हॅरिस नेमकं काय म्हणाल्या?

सध्या देशातील गरीब कुटुंबे अडचणीत आहेत. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प मात्र करदात्यांचे पैसे आपल्या राजेशाही थाटातील इच्छा पूर्ण करत आहेत. हे फारच चुकीचे आहे, अशी खरपूस टीका कमला हॅरिस यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमधील फक्त बॉलरुमच नव्हे तर लिंक बाथरुमलाही नवे रुप देत आहेत. विशेष म्हणजे लिंकन बाथरुमच्या केलेल्या कामाचे काही फोटोही त्यांनी त्यांच्या ट्रुथ या सोशल मीडिया मंचावर शेअर केले आहेत.

लिंकन बाथरुम नेमकं काय आहे?

व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्या मजल्यावर लिंकन बाथरुम आहे. अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन ज्या रुममध्ये काम करायचे त्याच रुमच्या एका भागात लिंकन बाथरुम आहे. साधारण 80 वर्षापूर्वीचे हे बाथरुम आहे. या बाथरुमला अगोदर हलक्या हिरव्या रंगाच्या टाईल्स होत्या. तसेच साधारण लाईट्स लावण्यात आलेले होते. आता मात्र या लिंकन बाथरुमला अगदी नवे रुप देण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी लिंकन बाथरुमला नवे रुप दिल्यानंतर सोशल ट्रुथवर काही फोटो पोस्ट केले आहेत. लिंकन बाथरुम 1940 च्या दशकात ग्रीन टाईल्सच्या मदतीने आर्ट डेको स्टाईलने तयार करण्यात आले होते. आता या बाथरुमला काळ्या-पांढऱ्या सँच्युरी संगमरवर, सोन्याचा नळ, गोल्ड फ्रेम असणाऱ्या आरशाने सजवण्यात आले आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. आता नव्याने बदलण्यात आलेले हे डिझाईन लिंकन युगाच्या भावनेनुसारच आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे वेगळा वाद

दरम्यान, अमेरिकेत एकीकडे शटडाऊन असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हाती घेतलेल्या कामामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प ऐतिहासिक वारशाला नवे जीवन देत आहे, असे ट्रम्प यांचे समर्थक म्हणत आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांचे हे कृत्य म्हणजे दिखाऊपणा आणि विलासीपणाचे प्रदर्शन आहे, अशी टीका काही लोकांनी केली आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प या सौंदर्यीकरणाच्या निर्णयामुळे भविष्यात अडचणीत सापडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.