Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प संतापले, माजी अधिकाऱ्याला तुरूंगात डांबणार? थेट भारताशी संबंध
Donald Trump vs John Bolton: काही दिवसापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी ट्रम्प सरकारवर टीका केली होती. अमेरिकेने भारतावर लादलेल्या 50% कराचा निर्णय ही मोठी चूक आहे असं बोल्टन यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता जॉन बोल्टन यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणलेले आहेत. अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतल्याने गेल्या काही काळापासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. काही दिवसापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी ट्रम्प सरकारवर टीका केली होती. अमेरिकेने भारतावर लादलेल्या 50% कराचा निर्णय ही मोठी चूक आहे असं बोल्टन यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता जॉन बोल्टन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी ट्रम्प प्रशासनाने केली असल्याचे दिसत आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
जॉन बोल्टन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने, बोल्टन यांनी गोपनीय कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आणि ते लीक केल्याचा आरोप आहे. यात राष्ट्रीय संरक्षणाविषयी माहिती शेअर केल्याचा आणि काही कागदपत्रे लपवून ठेवली असा आरोप केला आहे. हे सिद्ध झाल्यास बोल्टन यांनी तुरूंगवासही होऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे, ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात बोल्टन यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम केले. बोल्टन हे ट्रम्प प्रशासनातील एक जबाबदार व्यक्ती मानले जात होते. मात्र काही मुद्द्यांवरील मतभेदांमुळे बोल्टन हे ट्रम्प यांच्या विरोधात गेले.
बोल्टन यांच्यावरील आरोप काय ?
समोर आलेल्या माहितीनुसार, जॉन बोल्टन यांच्यावर 18 आरोप करण्यात आले आहेत. यात राष्ट्रीय संरक्षण माहिती बेकायदेशीरपणे शेअर करण्याबाबत आठ आरोप आणि ती लपवून ठेवण्याबाबत 10 आरोपांसा समावेश आहे. बोल्टन यांनी 2018-2019 या काळात संबंधित माहिती वैयक्तिक ईमेल खात्यावर घेतली आणि ती कुटुंबातील सदस्यांना पाठवली असं आरोपात म्हटले आहे. ही माहिती व्हाईट हाऊसमधील महत्त्वाच्या बैठका, परदेशी नेत्यांशी झालेली चर्चा आणि गुप्तचर माहितीशी संबंधित आहे. तसेच बोल्टनचे ईमेल अकाउंट इराणशी संबंध असणाऱ्या हॅकर्सनी हॅक केले होते, ज्यामुळे ही माहिती लीक होण्याचा धोका वाढला होता. आता हे आरोप सिद्ध झाले तर बोल्टन यांना प्रत्येक आरोपासाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे.
बोल्टन यांची भारताबाबत भूमिका
ज़ॉन बोल्टन यांनी अमेरिकेना भारतावर लादलेल्या 50 टक्के करावर टीका केली होती. हा 50 % कर मोठी चूक आहे असं बोल्टन यांनी म्हटलं होतं. तसेच अमेरिका वर्षानुवर्षे भारताला रशिया आणि चीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते प्रयत्न आता फसले आहेत. त्यामुळे ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील पूर्वीची खास मैत्री संपली आहे असंही बोल्टन म्हणाले होते.
