AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…जर तसं केलं नाही तर गंभीर परिणामांसाठी तयार राहा! डोनाल्ड ट्रम्पची चीनला थेट धमकी

डोनाल्ड ट्रम्पची मती गेल्या काही दिवसात फिरल्याचं दिसत आहे. टॅरिफ रणनितीतून जगभरातील अनेक देशांवर दबावाची रणनिती आखली जात आहे. असं असताना चीनला डोळे दाखवले आहे. जर चीनने अमेरिकेचे म्हणणं ऐकलं नाही गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

...जर तसं केलं नाही तर गंभीर परिणामांसाठी तयार राहा! डोनाल्ड ट्रम्पची चीनला थेट धमकी
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 26, 2025 | 5:05 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. टॅरिफच्या निर्णयामुळे अनेक देशांच्या निर्यातीवर थेट परिणाम झाल्याचं पाहिलं गेलं आहे. भारतावरही अमेरिकेने 50 टक्के कर लादला आहे. त्यामुळे अमेरिका आणि भारताचे संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारताच्या निर्यात नितीवर प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, अमेरिकेचा दबाव झिडकारून लावण्यासाठी रशिया, चीन आणि भारत यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित होताना दिसत आहेत. असं असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी नवं कार्ड बाहेर काढलं आहे. आता चीनला थेट इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध विकोपाला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्यूंग यांच्या समोर चीनला थेट धमकी दिली आहे.

चीनने अमेरिकेला दुर्मिळ मॅग्नेट पुरवावे अन्यथा संभाव्य 200 टक्के टॅरिफसाठी सज्ज व्हावे. हा इशारा व्यापार वादाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. “आम्हाला त्यांच्यावर 200 टक्के किंवा त्यासारखे काहीतरी शुल्क लावावे लागेल.”, असं ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्र्म्प यांनी पुढे सांगितलं की, माझ्याकडे काही असे पत्ते आहेत की ते काढले तर चीन देशोधडीला लागेल. “चीनसोबत आमचे चांगले संबंध असतील. त्यांच्याकडे काही पत्ते आहेत. आमच्याकडे त्यांच्यापेक्षा अधिक चांगले पत्ते आहेत, पण मला हे पत्ते खेळायचे नाहीत. जर मी हे पत्ते काढले तर ते चीनचा नाश होईल. मी हे पत्ते खेळणार नाही.”, असा धमकीवजा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार विराम 90 दिवासांसाठी वाढवला आहे. 12 ऑगस्ट रोजी अमेरिका आणि चीनने व्यापार युद्धविराम वाढवण्यावर सहमती दर्शवलीह होती. कारण दोन्ही देशाच्या करारावर चर्चा होऊ शकते. ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्रापती शीन जिनपिंग यांच्याशी नुकतीच चर्चा केली. तसेच बीजिंगला भेट देण्याचा विचार करत असल्याचं देखील सांगितलं.’या वर्षी किंवा त्यानंतर लवकरच चीनला जाऊ.’, असं ट्रम्प यांनी सांगितलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.