AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले, इराणने प्रस्ताव फेटाळताच…एका सोशल मीडिया पोस्टने खळबळ!

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांची भूमिका सांगितली आहे. त्यांनी इराला कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराणने चर्चेला गांभीर्याने घ्यायला हवे. अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, असं ट्रम्प म्हणाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले, इराणने प्रस्ताव फेटाळताच...एका सोशल मीडिया पोस्टने खळबळ!
donald trumpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 26, 2026 | 9:10 PM
Share

America Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सध्यातरी थांबलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सैन्याला पाच दिवसांसाठी इराणवर कोणत्याही प्रकारचा हल्ला करू नये, असा आदेश दिलेला आहे. दुसरीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामासाठी चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेने पाठवलेला 15 कलमी प्रस्ताव इराणने फेटाळला आहे. उलट इराणनेच अमेरिकेसमोर 5 कलमी प्रस्ताव ठेवला आहेत. युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत आम्हाला सार्वभौमत्त्व हवे आहे, अशीही मागणी इराणने अमेरिकेला केली आहे. दरम्यान, आता इराणने आपला प्रस्ताव फेटाळल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले आहेत. त्यांनी इराणला गंभीर अशारा दिला आहे.

इराणने चर्चेला गांभीर्याने घ्यायला हवे, अन्यथा…

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांची भूमिका सांगितली आहे. त्यांनी इराला कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराणने चर्चेला गांभीर्याने घ्यायला हवे. अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, असं ट्रम्प म्हणाले आहेत. “आमच्यासोबत करार करा अशी भीक इराणकडून मागितली जात आहे. सध्या अमेरिकेचं लष्कर पूर्णपणे नेस्तनाबूत झालं आहे. त्यांनी लवकरात लवकर गांभीर्याने वागायला हवे. कारण एकदा उशीर झाल्यावर नंतर मागे वळून पाहणे खूप कठीण होईल. मागे येण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहणार नाही,” असा रोखठोक इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

इराणने फेटाळला अमेरिकेचा प्रस्ताव

अमेरिकेने दिलेला 15 कलमी प्रस्ताव इराणने फेटाळला आहे. याउलट इराणनेच अमेरिकेला पाच कलमी प्रस्ताव पाठवला आहे. आम्हाल होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत सार्वभौमत्त्व हवे आहे. युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम तसेच प्रादेशिक सशस्त्र गटांना आमच्याकडून दिले जाणारे समर्थन यावर कोणतीही चर्चा होणार नाही, असे या पाच कलमी प्रस्तावात नमूद आहे.

दरम्यान, युद्धसमाप्तीची वेळ आम्हीच ठरवू, असेही इराणने सांगितले आहे. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराण नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज.
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा.
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.