AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imran Khan Arrested : मोठी बातमी, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

Pakistan Ex pm Imran Khan Arrested : इस्लामाबाद हायकोर्टाबाहेरुन पाकिस्तानी रेंजर्सनी इम्रान खान यांना अटक केली आहे.

Imran Khan Arrested : मोठी बातमी, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक
| Updated on: May 09, 2023 | 3:37 PM
Share

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाबाहेरुन पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना अटक केली. Imran Khan यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे वकील फैसल चौधरी यांनी इम्रान खान यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला. ‘अलकादिर ट्रस्ट केस’ प्रकरणात इम्रान खान यांना अटक झाली आहे. पीटीआय पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या पक्षाचे समर्थक नाराज झालेत. पीटीआयने इम्रान खान यांच्या अटकेनंतर विरोध प्रदर्शनाची घोषणा केली आहे.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद पोलिसांनी स्टेटमेंट जारी केलय. कादिरा ट्रस्ट केस प्रकरणात इम्रान खान यांना अटक झाल्याचं इस्लामाबादच्या आयजींनी सांगितलं. सध्या परिस्थिती सामान्य आहे. कलम 144 लागू करण्यात आलं आहे, असं आयजींनी सांगितलं. कोणी नियमांच उल्लंघन केलं, तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं आयजी म्हणाले.

‘ते खान साहेबांना मारत असतील’

पाकिस्तानातील तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या नेत्या मुसरत चीला म्हणाल्या की, “इम्रान खान यांचा छळ सुरु आहे. ते खान साहेबांना मारत असतील. ते खान साहेबांबरोबर काहीही करु शकतात”

पीटीआयच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन एक टि्वट केलं गेलय. त्यात हायकोर्टाच्या बाहेर इम्रान खान यांना अटक करताना, धक्काबुक्की दरम्यान इम्रान यांचे वकील जखमी झालेत, असं म्हटलय.

इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय म्हटलय?

पीटीआयचे उपाध्यक्ष फवाद चौधरी यांनी लोकांना घराबाहेर पडण्याच अपील केलय. इस्लामाबाद हाय कोर्टात हल्ला झालाय. इम्रान खान यांना अटक करण्यात आलीय. त्यांची अटक ही न्यायिक व्यवस्था बंद करण्यासारख आहे. फवाद चौधरी यांनी टि्वटमध्ये म्हटलय की, “हायकोर्टाला रेंजर्सनी घेरलय. वकिलांना त्रास दिला जातोय. इम्रान खान यांच्या कारला चारही बाजुंनी घेरण्यात आलय” ‘इम्रान खान यांच अपहरण केलय’

कोर्टाबाहेरुन इम्रान खान यांच अपहरण करण्यात आलय, असं पीटीआय नेते अजहर मशवानी म्हणाले. तात्काळ प्रभावाने पक्ष संपूर्ण देशात आंदोलन करेल, अशी घोषणा करण्यात आलीय.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.