AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Crisis : सत्तेतून बेदखल होताच नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा भारतावर अत्यंत गंभीर आरोप

Nepal Crisis : Gen-Z आक्रमक होताच केपी शर्मा ओली यांना दोन दिवसात नेपाळची सत्ता सोडावी लागली आहे. नेपाळमध्ये सध्या अराजकाची स्थिती आहे. सत्तेतून बेदखल झालेले नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आता भारतावर गंभीर आरोप केले आहेत. अयोध्य, प्रभू राम यांचा उल्लेख ओली यांनी केला आहे.

Nepal Crisis : सत्तेतून बेदखल होताच नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा भारतावर अत्यंत गंभीर आरोप
kp sharma oli
| Updated on: Sep 11, 2025 | 11:58 AM
Share

नेपाळमध्ये सत्तेतून बेदखल झालेले माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आता भारतावर आपला संताप व्यक्त करत आहेत. ओली यांनी भारतावर शाब्दीक हल्लाबोल केला आहे. “संवेदनशील मुद्यांवर मी भारताला आव्हान देण्याची हिम्मत दाखवली. त्यामुळे मला सत्तेतून बाहेर पडावं लागलं” असा ओली यांचा दावा आहे. ओली सध्या नेपाळी सैन्याच्या शिवपुरी बॅरकमध्ये आहेत. त्यांनी आपल्या पार्टीच्या सरचिटणीसाला पाठवलेल्या एका पत्रात भारतविरोधी वक्तव्य केली आहेत. ‘जर, मी लिपुलेखबद्दल बोललो नसतो, तर आज मी त्या पदावर असतो’ असं ओली यांनी म्हटलं आहे. लिपूलेख भारताचा भाग आहे. केपी शर्मा ओली यांनी लिपूलेख नेपाळच असल्याचा दावा केला होता.

“अयोध्या आणि प्रभू रामचंद्रांबद्दलच्या भूमिकेची राजकीय किंमत चुकवावी लागली आहे. मी अयोध्येत राम जन्माला विरोध केला म्हणून मला सत्ता गमवावी लागली” असा दावा केपी शर्मा ओली यांनी केला. जुलै 2020 मध्ये नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दावा केलेला की, ‘भगवान प्रभू राम भारतीय नाहीत. ते नेपाळी होते’ “नेपाळमध्ये बीरगंजच्या पश्चिमेला भगवान राम यांची अयोध्या आहे. भारताने एक वादग्रस्त अयोध्या निर्माण केलीय” अशी वक्तव्य ओली यांनी केली होती.

लिपुलेखचा वाद काय आहे?

लिपूलेख हा भारत-नेपाळमधील वादग्रस्त सीमावाद आहे. काळ्यापाण्याच्या आस-पासच हे क्षेत्र आहे. दोन्ही देश काली नदीच्या उगमावरुन असहमत आहेत. ही नदी लिपूलेखच्या उत्तर-पश्चिमेला लिंपियाधुरा येथून उगम पावते असा नेपाळचा दावा आहे. त्यामुळे काळपाणी आणि लिपूलेख या भागात येतं. भारताच म्हणणं आहे की, ही नदी काळंपाणी गावापासून सुरु होते. त्यामुळे हा उत्तराखंडचा भाग आहे.

नेपाळमध्ये सध्या राष्ट्रपती शासन

नेपाळमधल्या Gen-Z नी सोशल मीडिया बॅन आणि भ्रष्टाचाराविरोधात क्रांती करत ओली सरकारला उखडून टाकलं. ओली यांची भारताबद्दलची ही टिप्पणी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आली आहे. नेपाळमध्ये सध्या राष्ट्रपती शासन आहे. अंतरिम सरकार स्थापनचे काम चालू आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.