डोळ्यात अश्रू, शब्दांमध्ये तीव्र राग, संयुक्त राष्ट्रात 16 वर्षीय तरुणी बरसली

संयुक्त राष्ट्रातील हवामान बदलावरील उच्च स्तरीय परिषदेत जगभरातील दिग्गज नेत्यांसमोर भाषण सुरु केलं तेव्हा ही तरुणी सर्वांचे डोळे उघडणारे मुद्दे उपस्थित करेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. हवामान बदलाच्या मुद्द्यावर तुम्ही काही केलं नाही तर युवा पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असं ग्रेटा म्हणाली.

डोळ्यात अश्रू, शब्दांमध्ये तीव्र राग, संयुक्त राष्ट्रात 16 वर्षीय तरुणी बरसली
Follow us
| Updated on: Sep 23, 2019 | 10:34 PM

न्यूयॉर्क : हवामान बदलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणापूर्वी संयुक्त राष्ट्रात 16 वर्षांच्या एका तरुणीने (Greta Thunberg UN speech) जगाचे डोळे उघडणारं भाषण दिलं. जगभरातील नेत्यांना चिंतेत टाकणारे प्रश्न या तरुणीने उपस्थित केले. 16 वर्षीय पर्यावरण प्रेमी स्वीडनची ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg UN speech) संयुक्त राष्ट्रातील हवामान बदलावरील उच्च स्तरीय परिषदेत जगभरातील दिग्गज नेत्यांसमोर भाषण सुरु केलं तेव्हा ही तरुणी सर्वांचे डोळे उघडणारे मुद्दे उपस्थित करेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. हवामान बदलाच्या मुद्द्यावर तुम्ही काही केलं नाही तर युवा पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असं ग्रेटा म्हणाली.

संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांनीही ग्रेटाच्या भाषणाचं कौतुक केलं. डोळ्यात अश्रू आणि तीव्र वेदना घेऊन बोलत असलेली ग्रेटा म्हणाली, “तुम्ही आमचं बालपण, आमची स्वप्न, तुमच्या पोकळ शब्दांनी हिरावून घेतली. मी अजूनही नशिबवान आहे. पण लोक सहन करत आहेत, मरत आहेत, संपूर्ण परिसंस्था तुम्ही नष्ट केली आहे.”

पर्यावरणासाठी जगातील नेते काहीही करत नसल्याचा आरोप ग्रेटाने केला. तिच्या भाषणात ती भावूक झाली. “तुम्ही आम्हाला निराश केलंय. तुम्ही आम्हाला छळत असल्याची तरुण पिढीची भावना आहे. आमची नजर तुमच्यावर आहे आणि तुम्हीच जर आम्हाला पुन्हा निराश केलं तर भावी पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आत्ता, यावेळी तुम्हाला एक रेषा ओढावी लागेल. हे जग जागं झालं आहे आणि परिस्थिती बदलणार आहे, मग तुम्हाला ती परिस्थिती पसंत येवो किंवा नाही.”

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.