History : 20,000 लोकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा, दक्षिण आफ्रिकेतील अंदाधुंद गोळीबारात किती जणांचा मृत्यू?

20,000 लोकांनी एखाद्या पोलीस स्टेशनवर मोर्चा काढल्यावर हल्ल्याच्या भीतीने पोलिसांनी त्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना तुम्ही ऐकलीय का?

History : 20,000 लोकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा, दक्षिण आफ्रिकेतील अंदाधुंद गोळीबारात किती जणांचा मृत्यू?


केपटाऊन : 20,000 लोकांनी एखाद्या पोलीस स्टेशनवर मोर्चा काढल्यावर हल्ल्याच्या भीतीने पोलिसांनी त्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना तुम्ही ऐकलीय का? तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र, इतिहासात आजच्याच दिवशी (21 मार्च) असं घडलं आहे आणि त्यात तब्बल 69 लोकांना आपला जीव गमावावा लागला. तसेच 180 लोक जखमी झाले होते. ही घटना आहे. दक्षिण आफ्रिकेतील शार्पविले येथे घडली. त्यामुळेच या हत्याकांडाला शार्पविले हत्याकांड (Sharpeville Massacre) नावानेच ओळखलं जातं. ही घटना 21 मार्च 1960 रोजी ट्रांसवालमधील (Transville) शार्पविले दक्षिण आफ्रिका टाऊनशिप (South African Township) पोलीस स्टेशनमध्ये घडली (History of Sharpeville Massacre in South African Township know all about it).

कोणत्या कायद्यांमधील बदलाविरोधात आंदोलन

दक्षिण आफ्रिकेतील सरकारने 18 व्या शतकानंतर शहरांमधील काळ्या दक्षिण आफ्रिकी नागरिकांना रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या. त्याचाच भाग म्हणून 1950 च्या दशकात कृष्णवर्णीय लोकांच्या प्रवासावर आणि रोजगारावर निर्बंध लादण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आले. त्यावेळी तेथे नॅशनल पार्टीचं सरकार होतं. या सरकारने शहरी भागात काळ्या नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध आणले. त्यानुसार 16 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या काळ्या नागरिकांना सोबत पासबूक, ओळखपत्र सारखी कागदपत्रं बंधनकारक केली.

बहुतांश मुलं शाळेत जाण्याऐवजी गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सहभागी

या काळात शार्पविलेमध्ये बेरोजगारी आणि गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं. बहुतांश मुलं शाळेत जाण्याऐवजी गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सहभागी होत होते. त्यामुळे या भागातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शार्पविलेत एक नवं पोलीस स्टेशन तयार करण्यात आलं. या ठिकाणाहूनच पोलीस तपास आणि छापे मारण्याचं काम करत होते.

‘आमच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, आम्हाला अटक करा’

या कायद्यांविरोधात काळ्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष तयार झाला. आक्रमक आंदोलकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आमच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, आम्हाला अटक करा अशी मागणी केली. यावेळी घाबरलेल्या पोलिसांनी हल्ल्याच्या भीतीने नागरिकांवर बेछूट गोळीबार केला (South African Police). आंदोलन करणारे नागरिक शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते, मात्र तरीही पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोप होतो. दुसरीकडे काही लोक असंही सांगतात की आंदोलक हिंस्र झाले आणि पोलिसांवर दगडफेक करत होते. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला.

संपूर्ण आंदोलन काळात एकूण 249 लोकांचा बळी

अनेक नागरिकांना पळताना पाठीत गोळ्या लागल्या. त्यामुळे काहींचा जीव गेला तर काहींना कायमस्वरुपी अपंगत्व आले. अधिकृत आकडेवारीनुसार या गोळीबारात 69 लोकांचा मृत्यू झाला. यात 8 महिलांसह 10 मुलांचा समावेश होता. 180 लोक गंभीर जखमी झाले. यात 31 महिला आणि 19 मुलांचा समावेश होता. दुसरीकडे या संपूर्ण आंदोलन काळात एकूण 249 लोकांचा जीव गेल्याचं सांगितलं जातं. यात 29 मुलांचा समावेश होता.

हेही वाचा :

सहा बायका, 28 मुलं; नग्न मुलींचा डान्स फेस्टिव्हल भरवणाऱ्या ‘या’ राजाचा मृत्यू कशामुळे झाला?

खाणीत सापडला 378 कॅरेटचा लखलखीत हिरा, किंमत वाचून डोळेही लखलखतील

मराठमोळ्या उद्योजकावर दक्षिण आफ्रिकेत प्राणघातक हल्ला, जळगावचे तरुण उद्योजक मणियार यांचं निधन

व्हिडीओ पाहा :

History of Sharpeville Massacre in South African Township know all about it

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI