T-Dome : चिनी फायटर जेट, मिसाइल पाडण्यासाठी खास टी-डोम, इस्रायल, अमेरिकेच्या एअर डिफेन्सपेक्षा किती वेगळी असेल ही सिस्टिम?
What is T-Dome : चीन हा बेभरवशाचा देश आहे. मित्र बोलून कधी ते घात करतील याचा नेम नाही. म्हणून चीनवर विश्वास ठेवता येणार नाही. चीनच्या याच वाढत्या सैन्य हालचाली लक्षात घेऊन टी-डोम सिस्टिम बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सिस्टिम इस्रायल-अमेरिकेच्या सिस्टिम पेक्षा किती वेगळी असेल जाणून घ्या.

इस्रायलकडे आपलं आर्यन डोम आहे तर अमेरिका आपल्या गोल्डन डोमवर काम करत आहे. भारताकडे सुदर्शन चक्राच्या रुपात आपलं आर्यन डोम आहे. आता तैवानने बहुस्तरीय एअर डिफेंस सिस्टम टी-डोम बनवण्याचा संकल्प केलाय. तैवानला चीनकडून सर्वाधिक धोका आहे. देशाच्या शत्रुंपासून स्वसंरक्षण करण्यासाठी आम्ही आपली एअर डिफेन्स सिस्टिम बनवणार आहोत असं तैवानचे राष्ट्रपती लाई चिंग-ते म्हणाले. तैवानचं टी-डोम इस्रायलच्या आर्यन डोम आणि अमेरिकेच्या गोल्डन डोमपेक्षा किती वेगळं असेल ते जाणून घेऊया. याचं वैशिष्ट्य काय आहे?
राष्ट्रीय दिवस समारंभात आपल्या भाषणात तैवानचे राष्ट्रपती लाई चिंग-ते म्हणाले की, “देशाच्या शत्रुंपासून असलेला धोका लक्षात घेता बहुस्तरीय एअर डिफेंस सिस्टमटच्या निर्माणाला गती देणार. तैवानमध्ये हाय लेव्हल डिटेक्शन आणि इफेक्टिव इंटरसेप्शनवाल्या टी-डोम बनवण्याचा वेग वाढवण्यात येईल”
चीनला काय इशारा दिला?
“तैवान शांततेसाठी कटिबद्ध आहे. चीनने शक्तीच्या बळावर तैवान क्षेत्राची स्थिती बदलण्याचा विचार करु नये” असा इशारा त्यांनी दिला. तैवान आपल्या पुढच्या संरक्षण बजेटमध्ये सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपीच्या तीन टक्के आणि 2030 पर्यंत पाच टक्के खर्च करेल.
कशी असेल ही सिस्टिम?
तैवानच्या राष्ट्रपतींनी टी-डोम सिस्टिमबद्दल यापेक्षा जास्त माहिती दिली नाही. त्यामुळे त्याची किंमत आणि वैशिष्ट्यांबद्दल अजून माहिती मिळू शकली नाही. ही सिस्टिम कधीपर्यंत कार्यान्वित होईल या बद्दल माहिती नाहीय. बहुतांश तज्ज्ञांच म्हणणं आहे की, इस्रायलच्या आर्यन डोमच्या धर्तीवरच ही सिस्टिम बनवण्यात येईल.
अमेरिकेची गोल्डन डोम सिस्टिम
राष्ट्रपतींशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, “आम्ही एक शक्तीशाली एअर डिफेन्स सिस्टिम बनवण्याची अपेक्षा करतो. त्याचा इंटरसेप्शन रेट जास्त असेल. अमेरिकेसारखे देश अशीच सिस्टिम तयार करत आहेत” अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याचवर्षी मे महिन्यात गोल्डन डोम मिसाइल डिफेन्स सिस्टिमच्या योजनेचा खुलासा केला. 175 बिलियन डॉलर मोजून अमेरिका अशी सिस्टिम तयार केली जाणार आहे. ही सिस्टिम अवकाशातच शत्रुची मिसाइल संपवेल. भारताने ऑपरेशन सिंदूरवेळी आपली एअर डिफेन्स सिस्टिम दाखवून दिली. त्यामुळे पाकिस्तानने प्रचंड मोठे हल्ले करुनही त्यांचा एकही मिसाइल हल्ला यशस्वी झाला नाही.
