डेन्मार्कवर झाला हायब्रिड हल्ला, रशियाकडे संशयाची सुई ? जगात खळबळ, काय असतो हा हल्ला, वाचा…
डेन्मार्क देशावर या आठवड्यात दुसऱ्यांदा हायब्रिड हल्ला झाला आहे. त्यामुळे जगात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात रशियाचा हात नाकारता येऊ शकत नाही असे डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे.

डेन्मार्क हा देश अलिकडे विचित्र संकटात सापडला आहे. येथील प्रमुख विमानतळांवर अनोखी ड्रोन अचानक उडताना दिसल्याने या देशातील विमानांची वाहतूक ठप्प झाली आहे. या हल्ल्याला डेन्मार्कने ‘हायब्रिड हल्ला’ म्हटले आहे. त्यामुळे हा हायब्रिड हल्ला नेमका काय असतो. त्याने काय होते याची जगात चर्चा सुरु झाली आहे.
डेन्मार्कच्या आकाशात या आठवड्यात दुसऱ्यांदा दोन प्रमुख विमानतळांवर संशयित ड्रोन दिसले. आज डेन्मार्क देशाच्या उत्तरेतील वाणिज्यिक आणि सैन्य उड्डाणांसाठी वापरले जाणारे आल्बोर्ग विमानतळाच्या वरती एक ड्रोन टेहळताना दिसला. यामुळे या विमानतळाला तात्पुरते बंद करावे लागले.
या आधी देखील २२ सप्टेंबर रोजी आकाशात ड्रोन दिसल्यानंतर कोपेनहेगन विमान तळाला अनेक तास बंद ठेवावे लागले. त्यानंतर डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी सांगितले की यास रशियाचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्यामुळे जगात खळबळ उडाली आहे.
डेनिश विमानतळावर दिसले ड्रोन
बीबीसीच्या बातमीनुसार आता आल्बोर्ग एअरपोर्टवर ड्रोन टेहळताना दिसल्यानंतर डेनमार्कचे संरक्षण मंत्री ट्रॉल्स लुंड पॉल्सन यांनी स्पष्टपणे सांगितले की डेन्मार्क हा एका हायब्रिड हल्ल्याचा लक्ष्य ठरला आहे. त्यांनी सांगितले की हा हल्ला एक नियोजित हल्ला होता.ज्यात एका मोठ्या भागात आणि सैन्य ठाण्यांजवळ ड्रोनचा वापर केला गेला. या मागे जी कोणी व्यक्ती असेल ती प्रोफेशनल आणि प्रशिक्षित व्यक्ती आहे.
न्याय मंत्री पीटर हम्मेलगार्ड यांनीही यास हायब्रिड हल्ला म्हणून जाहीर केले आहे. डेनिश अधिकाऱ्यांनी देखील हे कृत्य प्रोफेशनल व्यक्तीचेच असल्याचे म्हटले आहे. प्रोफेशनल व्यक्तीने स्थानिक स्तरावर ड्रोन डागले होते. त्यांनी मात्र थेट रशिया किंवा अन्य कोणत्या देशाला जबाबदार ठरवले नाही.
काय असतो हायब्रिड हल्ला ?
नाटोच्या नुसार हायब्रिड हल्ला एक अशी रणनीती आहे ज्यात मिलिट्री आणि नॉन – मिलिट्री दोन्ही प्रकरच्या टुल्सचा वापर केला जातो. कोणत्याही देशाला अस्थिर करण्यासाठी वा त्याच्यावर आर्थिक दबाव आणण्यासाठी एक साथ सायबर हल्ल्यासारखे असैनिक हल्ले, ड्रोन अटॅक, खाजगी आर्म्ड फोर्सेस कारवाया, नियमित सैन्याची तैनाती, देशाच्या अंतर्गत चुकीची माहिती प्रसारीत करणे, सार्वभौम आणि आर्थिकदृष्टीने महत्वाच्या संस्थेच्या वेबसाईट हॅक करणे असा कारवाया केल्या जातात.ट
हायब्रिड हल्ल्याचा हेतू काय ?
हायब्रिड हल्ल्यांचा हेतू देशाच्या अंतर्गत अस्थितरता वा अशांतता पसरवण्याचा असतो. यासाठी विविध सैनिक आणि गैरसैनिक रणनितीचा वापर केला जात असतो. अनेकदा हायब्रिड हल्ले गुप्तपणे केले जातात. तर अनेकदा जाहीरपणे हे हल्ले केले जातात. यामुळे देशातील जनतेत गैरसमज पसरतात. युद्ध आणि शांततेदरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण केली जाते.
