पाकिस्तानला दणका, निजामाची अब्जावधींची संपत्ती भारतात येणार

भारताच्या फाळणीच्या वेळी निजामाची लंडनच्या एका बँकेत जमा असलेल्या रक्कमेबाबत भारत आणि पाकिस्तानमध्ये खटला सुरु होता. या रकमेवर भारत आणि निजामाच्या (Hyderabad Nizam fund) उत्तराधिकारीचा अधिकार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं.

पाकिस्तानला दणका, निजामाची अब्जावधींची संपत्ती भारतात येणार
Follow us
| Updated on: Oct 02, 2019 | 6:39 PM

लंडन : हैदराबादच्या निजामाच्या संपत्तीबाबत ब्रिटनच्या हायकोर्टात सुरु असलेल्या खटल्यात (Hyderabad Nizam fund) अखेर भारताच्या बाजूने निकाल आलाय. भारताच्या फाळणीच्या वेळी निजामाची लंडनच्या एका बँकेत जमा असलेल्या रक्कमेबाबत भारत आणि पाकिस्तानमध्ये खटला सुरु होता. या रकमेवर भारत आणि निजामाच्या (Hyderabad Nizam fund) उत्तराधिकारीचा अधिकार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं.

70 वर्षांपासून हा खटला सुरु होता. निजामाचे वंशज प्रिन्स मुकर्रम जाह आणि त्यांचे धाकटे बंधू भाई मुफ्फखम जाह यांनी या खटल्यात भारत सरकारची साथ दिली. फाळणी झाली तेव्हा हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खानने लंडनमधील नेटवेस्ट बँकेत 1007940 पौंड म्हणजे जवळपास 8 कोटी 87 लाख रुपये जमा केले होते.

निजामाने जमा केलेली ही रक्कम आता 35 मिलियन पौंड म्हणजे 3 अब्ज 8 कोटी 40 लाख रुपये झाली आहे. या मोठ्या रकमेवर भारत आणि पाकिस्तान दोन्ही राष्ट्राकडून दावा करण्यात आला. हैदराबादचा सातवा निजाम उस्मान अली खान या रकमेचे मालक होते आणि त्यांचे वंशज, भारत हे आता दावेदार आहेत, असं लंडनच्या रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायमूर्ती मार्कस स्मिथ यांनी स्पष्ट केलं.

हैदराबादच्या तत्कालीन निजामाने 1948 मध्ये ब्रिटनमध्ये पाकिस्तानच्या उच्चायुक्ताला ही रक्कम पाठवली होती. भारताचं समर्थन करणारे निजामाचे वंशजही या रकमेवर त्यांचा दावा सांगतात, तर पाकिस्ताननेही दावा केला होता. या रकमेबाबत कोर्टाने निजामाच्या वंशजांचा उत्तराधिकार मान्य केला याबाबत आनंद असल्याची प्रतिक्रिया निजामाच्या वंशजांचे वकील पॉल हेविट यांनी दिली.

शेवटच्या निजामाचे नातू 80 वर्षीय मुकर्रम जाह हे सध्या तुर्कीमध्ये राहतात. त्यांच्या बालपणीच कोर्टात हा खटला सुरु झाला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.