AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरले! रशियासमोर या देशाने अखेर टेकले गुडघे, चिंतेचे वातावरण, ड्रोन हल्ले…

मागील काही दिवसांपासून युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका भारतासह अनेक देशांना बसतोय. हेच नाही तर या युद्धाचाच एक भाग म्हणून अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावलाय. आता चीनला देखील मोठी धमकी देण्यात आलीये.

जग हादरले! रशियासमोर या देशाने अखेर टेकले गुडघे, चिंतेचे वातावरण, ड्रोन हल्ले...
Russia
| Updated on: Sep 15, 2025 | 12:56 PM
Share

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चांगलेच पेटल्याचे बघायला मिळतंय. यादरम्यान पोलंडच्या हद्दीतून रशियाचे 19 ड्रोन गेल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ही चूक असल्याचे म्हटले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाने पोलंडने संताप व्यक्त केला. आता नुकताच नाटो देशांची एक महत्वाची मिटिंग झाली. ज्यामध्ये ड्रोन हल्ल्याच्या घटनेवर भाष्य करण्यात आले. नाटो महासचिव मार्क रूट आणि युरोपियन युनियनचे राजदूतांची बैठक झाली. यावेळी एक चर्चा झाली की, सदस्य देशांची ड्रोन हल्ला झाल्यानंतर उत्तर देण्यााची तेवढी ताकद दिसत नाही. पोलंडच्या हवाई हद्दीत रशियन ड्रोनने घुसखोरी केल्याने मोठी खळबळ उडाली.

आता यावर चिंता जाहीर करत सांगितले गेले की, ड्रोन हल्ले खूप कमी होतात आणि त्याला उत्तर देण्यासाठी मोठा खर्च लागतो. 11 डॉलरच्या ड्रोनने हल्ले केले जातात. त्याला उत्तर देण्यासाठी एअर टू एअर हल्ला करण्यासाठी 4 लाख डॉलरचे मिसाईल चालवले जाते. हे खूप जास्त खर्चिक आहे. हेच कारण आहे की, नाटो देशांनी ड्रोन हल्ल्याला उत्तर देण्यासाठी असमर्थता दाखवली. पोलंडने ड्रोन हल्ल्याला उत्तर देण्याऐवजी थेट हार मानल्याने जगात खळबळ उडालीये.

पोलंडने म्हटले की, रशियाने पाठवलेल्या 3 ते 4 ड्रोनला पाडण्यात त्यांना यश आले. सध्या रशियाच्या ड्रोनमुळे नाटो देशांमध्ये खळबळीचे वातावरण बघायला मिळतंय. पोलंडमध्ये आलेले रशियाचे ड्रोन हे मोठे चॅलेंज मानले जात आहे. कारण त्याला रोखण्यात फार काही यश मिळाले नाहीये. पोलंडच्या मुद्द्यावरच नाटो देशांनी बैठक बोलावली होती. नाटो देशांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, ड्रोन पाठण्यासाठी f-35 सारखे फायटर जेट बसू शकत नाहीत.

सध्या ड्रोन हल्ला रोखण्यासाठी कमी पैसे लागतील अशा गोष्टी विकसीत केल्या जातील. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध हे अधिकच भडकताना दिसत आहे. त्यामध्येच रशियन ड्रोन हे पोलंडच्या हवाई हद्दीत घुसल्याने खळबळ झाली. पोलंडने या गोष्टीचा निषेध केला. शिवाय तातडीची नाटो देशांची महत्नाची बैठक देखील बोलावली. मात्र, या बैठकीतून काहीच पर्याय हा निघू शकला नाहीये.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.