AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशियातील तिसरी महासत्ता बनला भारत, जपान आणि रशियाला टाकलं मागे

रशिया आणि जपानसारख्या महासत्तांना मागे टाकत भारत आशियातील तिसरी मोठी महासत्ता बनला आहे. यादीत अमेरिका आणि चीन पहिला आणि दुसऱ्या स्थानावर आहे. पण भारताने मोठी उडी घेतली आहे. भारताने रशिया आणि जपानला मागे टाकले आहे. त्यामुळे भविष्यात भारताची ताकद आणखी वाढणार असल्याचं या अहवालात म्हटले आहे,

आशियातील तिसरी महासत्ता बनला भारत, जपान आणि रशियाला टाकलं मागे
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 24, 2024 | 8:43 PM
Share

संपूर्ण जगात भारताची ताकद काय आहे हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. नुकताच एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवीने जाहीर केलेल्या एशिया पॉवर इंडेक्सच्या क्रमवारीत भारत महत्त्वपूर्ण स्थानावर पोहोचला आहे. अहवालानुसार, अमेरिका आणि चीननंतर भारत तिसरी महासत्ता बनलाय. भारताने रशिया आणि जपानला देखील मागे टाकलंय. भारत आता तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा स्कोअर 39.1 आहे, तर जपानचा स्कोअर 38.9 आहे, ज्यामुळे तो चौथ्या स्थानावर घसरला आहे. या क्रमवारीत पाकिस्तानची स्थिती खूपच वाईट आहे. आशियात अजूनही अमेरिका आणि चीन मोठी सत्ता असली तरी भारताकडे मोठी संधी आहे. चीनची आर्थिक आणि लष्करी ताकद स्थिर आहे. आठपैकी सहा शक्तींच्या पॅरामीटर्समध्ये अमेरिका आघाडीवर आहे. पण भारताची स्थिती सुधारत आहे. जपान आणि रशियाला मागे टाकून भारताने आशियामध्ये तिसरे स्थान पटकावले आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताचं वर्चस्व वाढल्याने याचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. त्यांच्या दूरदर्शी दृष्टीकोन आणि जागतिक रणनीतीमुळे हे शक्य झाल्याचं त्यांनी म्हटले आहे. अहवालानुसार, 2023 मध्ये भारताने एशिया पॉवर इंडेक्स देशांसोबत सर्वाधिक देशांसोबत संवाद केला. भारत आपली राजनैतिक स्थिती मजबूत करत असल्याचे देखील या अहवालातून समोर आले आहे.

भारताची शक्ती कशी वाढत आहे?

ऑस्ट्रेलियन थिंक टँकच्या मते, भारताचं सामर्थ्य हे त्यांची लोकसंख्या आणि वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. अहवालात भारताची आर्थिक क्षमता 4.2 अंकांनी वाढली आहे. भविष्यातील संसाधनांच्या बाबतीत भारताच्या गुणसंख्येमध्ये 8.2 गुणांची वाढ झाली आहे. भारताची तरुण लोकसंख्या येत्या काही दशकांमध्ये भारताला पुढे घेऊन जाऊ शकते. आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्या यामुळे भारत आणखी मजबूत होईल.

भारत आशियातील खास देश

लोवी इन्स्टिट्यूटचा अहवालानुसार, आशियातील सत्ता जरी अमेरिका आणि चीनकडे असली तरी भारत हा देश आशिया खंडातील खास आणि महत्त्वाचा देश आहे. असे या अहवालात म्हटले आहे. हळूहळू भारताचे आर्थिक सामर्थ्य, लष्करी सामर्थ्य आणि मुत्सद्दी रणनीती वाढत आहे. ज्यामुळे भविष्यात ते  महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. शेजारी देश पाकिस्तानची स्थिती या क्रमवारीत डळमळीत आहे. या यादीत पाकिस्तान 14.4 व्या क्रमांकासह 16 व्या स्थानावर आहे.

भारताची सत्ता एका नव्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे. भारताने आपल्या साधनसंपत्तीचा योग्य वापर करत आपली मुत्सद्दी क्षमता वाढवली आहे. भारताच्या भूमिकेचा हा बदल केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण आशिया खंडासाठी महत्त्वाचा ठरेल.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता