America Tariff : भारताकडून अमेरिकेची कानउघडणी, थेट दाखवला आरसा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत…
India responded to US criticism : भारतावर 50 टक्के टॅरिफ लावूनही भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचा संताप सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार भारतावर आग ओकताना दिसत आहेत. आता भारताकडून त्यांना सडेतोड उत्तर देण्यात आलंय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवस भारतावर टीका करताना दिसले. मात्र, आता त्यांची भारताबद्दलची भाषा बदलली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार पीटर नवारो हे अजूनही भारतावर टीका करताना दिसत आहेत. काल दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले की, पुतिन यांच्यासोबत चीनच्या मंचावर शीसोबत बसणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्यवस्थित वाटत नव्हते. हेच नाही तर यावेळी ते बैचेन दिसले. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्वकाही सांगून जात होती. आता भारताकडून पीटर नवारो यांच्या या टीकेला जोरदार उत्तर देण्यात आले. पीटर नवारो हे भारतावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना दिसले.
भारताचे माजी विदेश सचिव कंवल सिब्बल यांनी अमेरिकेला आरसा दाखवलाय. नवारो यांच्या टिकेला उत्तर देत त्यांनी म्हटले की, भारत आणि चीनच्या संबंधांबद्दल त्यांना पूर्ण माहिती नाहीये. त्यांनी पुढे म्हटले, नवारो यांना लांबून एखाद्याच्या डोक्यात काय सुरू आहे हे वाचता येते. मुळात म्हणजे त्यांना दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल पूर्ण माहिती नाहीये. मोदींनी 2014 मध्ये पंतप्रधान बनल्यानंतर 18 वेळा भेट घेतली आहे द्विपक्षीय दाैरे आणि शिखर संमेलनात बैठकींमध्ये भाग घेतलाय.
नरेंद्र मोदी हे आतापर्यंत 5 वेळा चीनला गेले आहेत. शी हे देखील दोनदा भारताच्या दाैऱ्यावर आले आहेत. ब्रिक्स समिटमध्येही दोघे कजानमध्ये भेटले होते. वेगवेगळ्या बैठकांमध्ये दोघांमघ्ये कायमच भेटी होतात. चीनसोबत आमचे काय नेमके मुद्दे आहेत, हे आम्हाला खूप चांगल्याप्रकारे माहिती आहे. त्यांना कसे सांभाळून घ्यायचे हे देखील आम्हाला माहिती आहे. आमचे सैनिक आताही लद्दाखमध्ये लढत आहेत. नवारो यांना भारताकडून सडेतोड उत्तर देण्यात आलंय.
नवारो यांनी भारताला टॅरिफचा महाराजा देखील म्हटले होते. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, म्हणून बरेच प्रयत्न केले. मात्र, भारताने रशियाकडून तेल खरेदी कायम ठेवली. हेच नाही तर रशियाकडून जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत अधिक तेल खरेदी करण्यात आलीये. हा मोठा धक्का अमेरिकेला नक्कीच म्हणावा लागेल.
