इराण-इस्रायल युद्धादरम्यान भारताचा मास्टरस्ट्रोक, रशियाच्या मदतीने केलं हे काम
इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी भारताने एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे.

इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. खासकरुन कच्च्या तेलाच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र आता भारताने एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारताने रशियाकडून तेलाची आयात वाढवली
इराण आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये तेलाचे मोठे साठे आहेत. या देशांमधून जगभरात तेलाचा पुरवठा केला जातो. मात्र आता युद्धामुळे तेल बाजारात खळबळ उडाली आहे. मात्र आता भारताने मास्टरस्ट्रोक खेळत रशियाकडून तेल आयात वाढवली आहे. जूनमध्ये भारताने रशियाकडून विक्रमी प्रमाणात तेल खरेदी केले, जे सौदी अरेबिया आणि इराकसारख्या देशांकडून घेतल्या जाणाऱ्या तेलापेक्षा जास्त आहे. याचाच अर्थ भारताने रशियाच्या मदतीने आपला तेलसाठी वाढवण्याचे काम केले आहे.
केप्लर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये भारताने रशियाकडून दररोज 20-22 लाख बॅरल तेल आयात केले. गेल्या दोन वर्षांतील हा आकडा सर्वाधिक आहे. याआधी मे महिन्यात हा आकडा 19.6 लाख बॅरल प्रतिदिन होता. यात आता वाढी झाली आहे. भारताने रशियाकडून इतके तेल खरेदी केले की ते इराक, सौदी अरेबिया, युएई आणि कुवेतमधून आयात होणाऱ्या एकूण तेलापेक्षा जास्त आहे. यामुळे युद्धामुळे तेलाचे बाजार वाढले तरी भारताला फारसा फरक पडणार नाही.
अमेरिकेकडूनही तेल खरेदी वाढली
भारताने अमेरिकेकडूनही जास्त तेल खरेदी केले आहे. आकडेवारीनुसार जूनमध्ये भारताने अमेरिकेकडून दररोज 4.39 लाख बॅरल तेल खरेदी केले. याआधी मे महिन्यात ते 2.80 लाख बॅरल होते. त्यामुळे आता भारतातील कच्च्या तेलाचा साठा वाढला आहे.
तेल पुरवठ्यावर अद्याप परिणाम नाही
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु असल्यामुळे तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. या युद्धामुळे तेल अद्याप आखाती देशांकडून होणाऱ्या तेल पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. युद्ध सुरु असताना इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. या मार्गाने जगातील 20% तेल आणि एलएनजी वाहतूक केली जाते. तसेच भारत आपले 40 % तेल आणि 20% गॅस आयातीसाठी हा मार्ग वापरतो.
भारताची स्मार्ट रणनीती
गेल्या 2 वर्षांत भारत सरकारने आपली तेल आयात रणनीती स्मार्ट बनवली आहे. रशियाकडून मिळणारे तेल स्वस्त असल्याने फेब्रुवारी 2022 मध्ये आयात वाढवली होती. पूर्वी भारतात येणाऱ्या तेलाच्या फक्त 1 % तेल रशियाकडून येत होते, मात्र आता हा आकडा 40-44% पर्यंत पोहोचला आहे. महत्वाची बाब म्हणजे रशियाकडून खरेदी केलेले तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत नाही, ते सुएझ कालवा, केप ऑफ गुड होप किंवा पॅसिफिक महासागरातून येते. त्यामुळे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली तरी भारताला होणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होणार नाही.