Tarriff War : भारतावर टॅरिफचं ओझं आणखी वाढणार ? ट्रम्पच्या मंत्र्याने पुन्हा उगाळलं विष
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट म्हणाले की, जर अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अधिक कडक निर्बंध लादले तर रशियन अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल.

अमेरिकेची सध्या भारतावर नाराजी असून 50 टक्के ट2रिफ लावत त्यांनी ती स्पष्टपणे व्यक्तही केली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यास अमेरिकेचा कडक विरोध असून त्याच पार्श्वभूमीवर भारतावर आता 50 टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. मात्र भारताने आपली भूमिका ठाम ठेवत कोणासमोरही झुकणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळेच सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्पनी वेळोवेळी नाराजी वर्तवली असली तरी काही दिवसांपूर्वी त्यांनी सूर बदलत पंतप्रधान मोदी आपले मित्र असल्याचे सांगितले होते. त्यांच्या वेळीवेळी बदलणाऱ्या या भूमिकेमुळे त्यांच्या मनात नक्की काय चाललय याचा निश्चित अंदाज बांधणं कठीण आहे.
त्यातच आता ट्रम्प प्रशासनातील एका मंत्र्याने केलेल्या विधानामुळे पुन्हा खळबळ माजली आहे.. ‘जर अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अधिक कठोर निर्बंध लादले तर रशियन अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल’ असे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट रविवारी म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत
एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. अमेरिकेचे वित्त सेक्रेटरी स्कॉट बेसंट म्हणाले की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी खूप महत्त्वाची चर्चा केली. एवढंच नव्हे तर रशियावर अधिक दबाव आणण्यासाठी अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) कोणती पावले उचलू शकतात याबद्दलही युरोपियन कमिशनने त्यांच्याशी चर्चा केली.
आधीच जाहीर केलेल्या 25२५ टक्के रेसिप्रोकल टॅरिफ व्यतिरिक्त ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादला आहे, जे गेल्या महिन्यात म्हणजे 27 ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेकडून भारतावर एकूण 50 टक्के टॅरिफ लादण्यात आल आहे.
तर काही दिवसांपूर्वीच ट्र्म्प यांनी एक विधान केलं होतं. भारत रशियाकडून बरंच तेल खरेदी करत असल्यामुळे आपण निराश असल्याचे त्यांनी नमूद केलं होतं. ते म्हणाले की अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात कर लादले आहेत, जेजे एकण 50 टक्के आहेत. ट्रम्प यांनी असेही म्हटले होते की, त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध आहेत आणि काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींनीही अमेरिकेचा दौरा केला होता. इतकेच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते आणि त्यांना त्यांचे मित्र आणि एक महान नेता म्हटले होते.
पीटर नवारोही बरळला
यापूर्वी स्कॉट बेसंट आणि पीटर नवारो सारख्या ट्रम्प प्रशासनाच्या मंत्र्यांनी विष उगळले होते. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, त्यामुळे रशियाला युक्रेनविरुद्धचे युद्ध सुरू ठेवण्यासाठी पैसे मिळत आहेत, असेही काहीजण म्हणाले होते.
भारताची प्रतिक्रिया
दरम्यान अमेरिकेने लादलेल्या अतिरिक्त शुल्काचा (टॅरिप) भारताने निषेध केला असून ते अन्याय्य आणि चुकीचे असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय गरजा आणि बाजारपेठेतील मागणीच्या आधारावर तेल खरेदी केली जात आहे, असे भारताने रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीचा बचाव करत म्हटले होते. त्यांची ऊर्जा खरेदी देशाच्या विकास आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आहे असेही भारतातर्फे स्पष्ट करण्यात आलं होतं.
