जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्यात भारत चौथ्या क्रमांकावर, तर पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्याच्या यादीत भारतीय सैन्य चौथ्या क्रमांकावर (Indian army fourth rank in world powerful force) आहे.

जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्यात भारत चौथ्या क्रमांकावर, तर पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?
Indian Army Bharti 2021
Follow us
| Updated on: Sep 30, 2019 | 2:27 PM

मुंबई : जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्याच्या यादीत भारतीय सैन्य चौथ्या क्रमांकावर (Indian army fourth rank in world powerful force) आहे. तर पाकिस्तानी सैन्य पंधराव्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ग्लोबल फायर पॉवर्स 2019 (Global fire powers 2019) यांनी केलेल्या सर्वेतून समोर आली आहे. यामध्ये जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्यात पहिला क्रमांक अमेरिकेच्या सैन्याचा, दुसरा  क्रमांक रशिया, तिसऱ्या क्रमांकावर चीन आणि चौथा क्रमांक भारतीय सैन्याचा (Indian army fourth rank in world powerful force) आहे.

ग्लोबल फायरपॉवरमध्ये या सूचीत 137 देशांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व देशाच्या सैन्याची रॅकिंग हत्यारे आणि सैनिकांच्या संख्या बळावर केली नसून प्रत्येक सैन्य दलात किती प्रकारची हत्यारे आहेत, सैन्याची एकूण श्रम शक्ती किती आहे, देशाची लोकसंख्या, भूगोल आणि विकासावर अभ्यासकरुन सैन्याला रॅकिंग देण्यात आली आहे.

रॅकिंगमध्ये आण्विक शस्त्रे असणाऱ्या देशाला बोनस गुण देण्यात आले आहेत. पण शेवटच्या रॅकिंगमध्ये या गुणांचा समावेश केला गेला नाही. विभिन्न अभ्यासानुसार सर्वाधिक 25 ताकदवान सैन्यांना या यादीत जागा देण्यात आली आहे.

भारतीय सैन्य विरुद्ध पाकिस्तानी सैन्य

रॅकिंगच्या माहितीनुसार, भारतीय सैन्याजवळ एकूण 34 लाख 62 हजार 500 सैनिक आहेत. एकूण 2082 विमानं आणि 4184 लढाऊ टँक आहेत. एक विमानवाहक युद्ध नौका आणि एकूण 295 नौसेना संपत्ती आहे. भारताचे संरक्षण बजेट 55.2 अब्ज डॉलर इतके आहे.

पाकिस्तानकडे एकूण सैन्य 12 लाख 4 हजार आहे. सैन्याजवळ 1342 विमानं आहेत. ज्यामध्ये 348 लढाऊ विमानं आहेत. तसेच त्यांचे सरंक्षण बजेट सात अब्ज डॉलर आहे.

दरम्यान, जगातील पंधरा ताकदवान सैन्यांच्या यादीत अमेरिका, रशिया, चीन, भारत, फ्रांस, जपान, दक्षिण कोरिया, युनायटेड किंग्डम, तुर्की, जर्मनी, इटली, मिस्त्र, ब्राझील, इरान आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.