दोन्ही पाय एक हात नसतानाही बास्केटबॉल खेळतो, जिममध्ये वेट लिफ्टिंग, जगाला प्रेरणा देणारी ही व्यक्ती कोण?

दोन्ही पाय एक हात नसतानाही बास्केटबॉल खेळतो, जिममध्ये वेट लिफ्टिंग, जगाला प्रेरणा देणारी ही व्यक्ती कोण?

माणसाकडे इच्छाशक्ती असेल तर तो कोणतीही गोष्ट करू शकतो. एखाद्या व्यक्तीकडे आवड आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही अडचण त्याला थांबवू शकत नाही.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Mar 30, 2021 | 3:23 AM

वॉशिंग्टन : माणसाकडे इच्छाशक्ती असेल तर तो कोणतीही गोष्ट करू शकतो. एखाद्या व्यक्तीकडे आवड आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही अडचण त्याला थांबवू शकत नाही. असाच संदेश देणारी व्यक्ती आहे निक सेंटोनास्टासो (nick santonastasso). निकला जन्मतः दोन्ही पाय आणि एक हात नाही. तरीही तो खचला नाही, उलट त्याने जिद्दीने जे काही केलं ते पाहून अनेकजण थक्क होतात (Inspiring story of Nick Santonastasso who have no leg and only one hand become body builder).

निक सेंटोनास्टासोला दोन्ही पाय आणि एक हात नसतानाही थांबणं माहिती नाही. इतक्या शारीरिक मर्यादा असतानाही तो आज एक यशस्वी उद्योजक, बॉडी बिल्डर, मॉडेल आहे. इंटरनेटवर तर त्याचीच चर्चा असते. 25 वर्षांचा नीक मोटिवेशनल वक्तही आहे. त्याबरोबर तो चांगला बास्केटबॉल खेळाडू देखील आहे. मैदानावर बॉलमागे धावणाऱ्या नीकला पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की त्याला दोन्ही पाय नाहीत.

निकचा प्रवास कसा?

निकने जे यश मिळवलं आहे ते शारीरिकदृष्ट्या सदृढ व्यक्तीलाही कठीण आहे. निक सेंटोनास्टासोसाठी तर ते आणखी कठीण होतं. त्यांचा जन्मच हॅनहार्ट सिंड्रोम (Hanhart syndrome) सोबत झाला. हा एक दुर्मिळ आजार आहे. यात शरीराच्या अवयवांचा विकास होत नाही. त्यामुळे त्याचा जन्म झाला तेव्हा त्याला दोन्ही पाय आणि एक हात नव्हता. अशा परिस्थितीतही त्याने हार मानली नाही.

निक म्हणतो, “एक दिवस माझ्या आई वडिलांनी मला समोर बसवून समजावले होते की, मी असा जन्मला आलो तरी मला सर्व कामे करता आली पाहिजेत. कारण हे जग तुझ्यासाठी थांबणार नाहीये. आम्ही तुझ्या आयुष्यभर तुझ्यासोबत नसणार आहोत.” आयुष्यातील संकटांना सामोरे गेल्यावर निकने खेळ आणि अडवेन्चरमध्ये आपलं करियर बनवलं.

हेही वाचा :

बापाने साड्या तर मुलाने ट्राऊजर्स विकल्या, अखेर ‘या’ गोष्टीमुळे किशोर बियाणी आहेत रिटेल किंग

10 हजारात हर्बल कंपनी सुरू केली अन्… तिची कहानी वाचाच!

व्हिडीओ पाहा :

Inspiring story of Nick Santonastasso who have no leg and only one hand become body builder

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें