AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Yoga Day 2022 | या देशात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट, राष्ट्रपतींनी दिले चौकशीचे आदेश!

भारतीय सांस्कृतिक केंद्र आणि मालदीवच्या क्रीडा मंत्रालयाने हा योगाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पहाटेच या कार्यक्रमाला सुरूवात झाली होती, जमाव स्टेटियममध्ये 6.30 च्या दरम्यान घुसला आणि गोंधळ सुरू झाला. विशेष म्हणजे जमावाच्या हातामध्ये झेंडे देखील होते. या जमावाचा योगा करण्यासाठी विरोध होता.

International Yoga Day 2022 | या देशात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट, राष्ट्रपतींनी दिले चौकशीचे आदेश!
| Updated on: Jun 21, 2022 | 4:15 PM
Share

मुंबई : संपूर्ण जगात आज आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मात्र, मालदीवमध्ये योगानिमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाला गालबोट लागलंय. 2014 मध्ये युनायटेड नॅशनल जनरल असेंब्लीच्या 69 व्या सत्रात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव दिला होता. 11 डिसेंबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग दिन प्रस्ताव 3 महिन्यांत बहुमताने स्वीकारण्यात आला. त्यानंतर संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनला साजरा केला जातो. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे (Program) आयोजन केले जाते.

इथे पाहा मालदीवमधील व्हिडीओ!

मालदीवमध्ये योगा दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट

योग दिनानिमित्त मालदीवमधील माले येथील राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियममध्ये योगाचा कार्यक्रम  ठेवण्यात आला होता. मात्र, कार्यक्रम सुरू असतानाच तेथे 60 ते 70 लोकांचा जमाव अचानक स्टेडियममध्ये दाखल झाला आणि गोंधळ करत योगा करत असलेल्या लोकांना हुसकावून लावण्यात आले. इतकेच नाही तर जमावाकडून सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसानही करण्यात आले. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मालदीवच्या राष्ट्रपतींनी केले ट्विट

जमावाने योगा करणाऱ्यांना धमकावले

भारतीय सांस्कृतिक केंद्र आणि मालदीवच्या क्रीडा मंत्रालयाने हा योगाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पहाटेच या कार्यक्रमाला सुरूवात झाली होती, जमाव स्टेटियममध्ये 6.30 च्या दरम्यान घुसला आणि गोंधळ सुरू झाला. विशेष म्हणजे जमावाच्या हातामध्ये झेंडे देखील होते. या जमावाचा योगा करण्यासाठी विरोध होता. जमावाने योगा करणाऱ्या लोकांना स्टेडियम लगेचच रिकामे करण्यास सांगितले. या जमावामधील काही लोकांनी योगा करणाऱ्या लोकांना धमकावल्याचे देखील सांगितले जात आहे.

राष्ट्रपती म्हणाले, संबंधितांवर कारवाई करणार

पोलिस घटनास्थळी लगेचच दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचे काम केले. यांसदर्भात मालदीवच्या राष्ट्रपतींनी ट्विट केले की, पोलिसांनी स्टेडियममधील घटनेचा तपास सुरू केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे, संबंधीत लोकांवर कारवाई केली जाईल, असे मालदीवच्या राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटंले आहे. मालदीवमध्ये सुरूवातीपासूनच योग दिनाच्या कार्यक्रमाला कट्टरवाद्यांनी विरोध केला होता आणि त्यांनी धमक्याही दिल्याचे कळते आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.