AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचेच लोक खामेनींना फासावर लटकावणार? इस्रायलच्या बड्या मंत्र्याची थेट धमकी; प्लॅनिंग काय?

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध चांगलंच भडकलं आहे. असे असतानाच आता इस्रायलच्या एका मंत्र्याने थेट खामेनी यांनी मोठी धमकी दिली आहे.

इराणचेच लोक खामेनींना फासावर लटकावणार? इस्रायलच्या बड्या मंत्र्याची थेट धमकी; प्लॅनिंग काय?
ayatollah ali khamenei and saddam hussein
| Updated on: Jun 17, 2025 | 9:23 PM
Share

Iran And Israel War : इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाने टोक गाठलंय. दोन्ही देश खुलेपणाने एकमेकांना धमकी देत आहेत. दरम्यान, सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी इराणचे प्रमुख नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येची धमकी दिली होती. खामेनी यांची हत्या होईल. त्यानंतरत हे युद्ध थांबेल, असं नेतान्याहू म्हणाले होते. इस्रायलने तर खामेनी यांच्या हत्येचाही प्लॅन तयार केला होता. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे त्याची अंमलबजावणी झाली आहे. असे असतानाच आता इस्रायल सरकारमधीलच एका बड्या मंत्र्याने खामेनी यांना त्यांचेच लोक फासावर लटकवतील असं भाकित केलंय.

इराणला आतापर्यंतची सर्वांत मोठी धमकी

मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी खामेनी यांना मोठी धमकी दिली आहे. खामेनी यांचेही हाल हुकूमशाहा सद्दाम हुसैन याच्याप्रमाणेच होतील. सद्दाम याच्याप्रमाणेच इराणचे लोकच खामेनी यांना फासावर लटकावतील, असं कत्झ यांनी म्हटलंय. इराणला ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि थेट धमकी असल्याचं बोललं जातंय. या धमकीनंतर इस्रायल काही मोठी कारवाई किंवा हल्ला करणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. अमेरिकेकडून या दोन्ही राष्ट्रांना उद्ध हा पर्याय नाही, असे सातत्याने सांगितले जात आहे.

कत्झ नेमकं काय म्हणाले?

खामेनी यांना एक तर इस्रायलच्या कारवाईला तोंड द्यावे लागले. किंवा त्यांच्याच देशाच्या नागरिकांच्या हातून खामेनी यांचा मृत्यू ङोईल. सद्दाम हुसैन याचा जसा मृत्यू मिळाला होता, अगदी तशाच पद्धतीन खामेनी यांना त्यांचेच नागरिक मारतील. अमेरिकेच्या आक्रमणानंतर इराकच्या जनतेने सद्दामला फासावर लटकावलं होतं, असं कात्झ स्पष्टपणे म्हणाले आहेत.

आता भविष्यात नेमकं काय होणार याकडे लक्ष

म्हणजेच, आम्ही खामेनी यांना संपवून टाकू किंवा त्यांना सत्तेतून खाली खेचू किंवा त्यांचेच नागरिक त्यांची हत्या करतील, असा संदेश इराणच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे आता आगामी काळात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता...
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत
सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?
महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा घणाघात
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!