महाभयंकर हल्ला… समुद्र रक्ताने लालेलाल… युद्धनौकेवर बॉम्बचा वर्षाव… कुणी दिला अमेरिकेला गंभीर इशारा?
Iran vs US : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढलेला आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांकडून युद्धाची तयारी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढलेला आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांकडून युद्धाची तयारी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता इराणने संपूर्ण जगाला एक मोठा संदेश दिला आहे. इराणी अधिकाऱ्यांनी राजधानी तेहरानमधील एंगेलाब स्क्वेअरमधील एका मोठ्या बिलबोर्डवर एक पोस्टर लावले आहे. यातून अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. या पोस्टरमध्ये नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
इराणमध्ये लागले पोस्टर्स
इराणने तेहरानमध्ये लावलेल्या पोस्टरमध्ये एक अमेरिकन विमानवाहू जहाज दाखवण्यात आले आहे. या जहाजावर लढाऊ विमाने जळत आहेत आणि या जहाजावर स्फोट होत आहेत. या जहाजावर अनेक मृतदेह पसरलेले दिसत आहेत. तसे समुद्रात रक्त पसरलेले दिसत आहे. या रक्तामुळे अमेरिकन ध्वजाच्या पट्ट्यांसारखे चित्र तयार झाल्याचे दाखवण्यात आले आहे. या पोस्टरवर लिहिले आहे की, ‘जर तुम्ही वारा पेरला तर तुम्हाला वावटळीचा सामना करावा लागेल.’ याचाच अर्थ तुम्ही आम्हाला त्रास दिला तर आम्ही तुम्हाला महाभयंकर वेदना देऊ.
इराणकडून हे पोस्टर अशावेळी आले आहे, जेव्हा अमेरिकन नौदलाचे यूएसएस अब्राहम लिंकन विमानवाहू जहाज आणि त्याच्यासोबतच्या अनेक युद्धनौका इराणच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत बोलताना म्हटले होते की, ‘या जहाजांची तैनाती एक सावधगिरीचा उपाय म्हणून करण्यात येत. मात्र आम्हाला कदाचित त्याचा वापर करावा लागणार नाही.’
‘ट्रिगरवर बोट…’ इराणचा अमेरिकेला इशारा
अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांची हत्या करण्याची धमकी दिली आहे. यावर इराणनेही कठोर भूमिका घेत अमेरिकेला गंभीर इशारा दिलेला आहे. रेव्होल्यूशनरी गार्ड कमांडरने अलीकडेच इशारा दिला आहे की आमचे सैन्य पूर्वीपेक्षा जास्त तयार आहे आणि त्यांचे बोट ट्रिगरवर आहे’. यातून असे स्पष्ट होते की इराणी सैन्यही युद्धासाठी तयार आहे. आता दोन्ही देश आगामी काळात काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हजारो मृत्यू आणि 40 हजार लोकांना अटक
इराणमध्ये अलिकडेच मोठे आंदोलन झाले होते. हे आंदोलन दडपण्यासाठी इराणी सरकारने बळाचा वापर केला होता. यात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच तब्बल 40 हजार लोकांना अटक करण्यात आली आहे. अमेरिकेने इराणवर शांततापूर्ण निदर्शकांना मारण्याचा आणि सामूहिक फाशीची योजना आखल्याचा आरोप केला आहे. मात्र इराणने हे दावे नाकारले आहेत.
