AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोटो पेटवला, थेट ओठांनी सिगारेट…सर्वोच्च नेत्याची झोप उडाली, तरुण मुलींच्या आंदोलनाने जगात खळबळ!

सध्या इराणधील सत्ताधीश अयातुल्लाह खामेनी यांची झोप उडाली आहे. तिथे तरुणींनी मोठे आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाची जगभरात मोठी चर्चा होत असून तरुणींचे पोटो सगळीकडेच व्हायरल होत आहेत.

फोटो पेटवला, थेट ओठांनी सिगारेट...सर्वोच्च नेत्याची झोप उडाली, तरुण मुलींच्या आंदोलनाने जगात खळबळ!
iranian women protestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 10, 2026 | 6:11 PM
Share

Iran Ayatollah Khamenei Protest : जगात अशी काही आंदोलनं उभी राहिलेली आहेत, ज्यामुळे अनेक बड्या नेत्यांना सत्तेच्या सिंहासनावरून पायउतार व्हावे लागलेले आहे. अनेक आंदोलनांनंतर काही ठिकाणी तर क्रांतीच घडून आलेली आहे. इराण देशात महिलांविषयी अतिशय कठोर कायदे आहेत. महिलांनी हिजाब परिधान करून बाहेर जावे, असा तेथील नियम आहे. परंतु गेल्या बऱ्याच वर्षांपासून तिथे या नियमाला विरोध केला जातोय. महिला वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करत आहेत. सोशल मीडियावरही काही महिला या नियमाविरोधात राग व्यक्त करतात. दरम्यान, सध्या या देशाचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनी यांच्याविरोधात नव्या आंदोलनाने जन्म घेतला आहे. इराणमधील तरुणींनी तिथे एक मोठे आंदोलन चालू केले आहे. खामेनी यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी केली जात आहे. महिला, तरुणी खामेनी यांचा फोटो जाळून सिगारेट शिलगावत आहेत. या अनोख्या आंदोलनाची जगभरात चर्चा होत असून खामेनी यांची झोप उडाली आहे.

इराणमध्ये नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार सध्या इराणमध्ये वेगवेगळ्या स्थानिक मुद्द्यांना घेऊन मोठे आंदोलन केले जात आहे. तिथे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याच असंतोषाला आता वेगवेगळ्या पद्धतीने वाट करून दिली जात आहे. लोक इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. इराणी तरुणींनी तर विरोधाची नवी पद्धत चालू केली आहे. इथे तरुणी खामेनी यांच्या फोटोला आग लावत आहेत. सोबतच आग लावलेल्या फोटोपासून त्या सिगारेट पेवटत आहेत. शिगारेट शिलगावलेले फोटो तरुणी सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. साधारण तीन वर्षांपूर्वी महसा अमिनी या मुलीचा हिजाबविरोधी आंदोलनात मृत्यू झाला होता. सध्या तरुणींकडून सोशल मीडियावर चालवल्या जात असलेल्या मोहिमेला महसा अमिनीच्या आंदोलनाशी जोडले जात आहे.

सामाजिक आणि धार्मिक नियमांनाही आव्हान

इराणध्ये तरुणींकडून चालू असलेल्या या आंदोलनाची जगभरात चर्चा होत आहे. हे आंदोलन म्हणजे फक्त खामने यांच्या राजसत्तेलाच नव्हे तर महिलावर लागदलेल्या कठोर सामाजिक आणि धार्मिक नियमांनाही आव्हान असल्याचे बोलले जात आहे. सध्या इराण गंभीर आर्थिक संकटात आहे. सोबतच तिथे लोकांमध्ये आक्रोश आहे. असे असताना आता तरुणींच्या या वेगळ्या आंदोलनामुळे इराणमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? याकडे समस्त जगाचे लक्ष लागले आहे.

बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा
बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा.
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत.
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप.
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड.
भाजपचं बेगडी हिंदुत्व, दानवेंकडून रावसाहेब दानवेंचा जुना व्हिडीओ ट्वीट
भाजपचं बेगडी हिंदुत्व, दानवेंकडून रावसाहेब दानवेंचा जुना व्हिडीओ ट्वीट.
भाजप आमदाराची भरसभेत थेट फडणवीसांकडे अजितदादांची तक्रार, म्हणाले...
भाजप आमदाराची भरसभेत थेट फडणवीसांकडे अजितदादांची तक्रार, म्हणाले....
जिसे लढना ना मालूम वह तीर तलवार क्या जाने, गुलाबराव पाटलानी सभा गाजवली
जिसे लढना ना मालूम वह तीर तलवार क्या जाने, गुलाबराव पाटलानी सभा गाजवली.
उद्धव ठाकरेंनी घोटाळे करुन मुंबईला लुटलं... एकनाथ शिंदेंनी वाचला पाढाच
उद्धव ठाकरेंनी घोटाळे करुन मुंबईला लुटलं... एकनाथ शिंदेंनी वाचला पाढाच.
ठाकरे म्हणाले अश्रू नव्हे हे अंगार! उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात का पाणी?
ठाकरे म्हणाले अश्रू नव्हे हे अंगार! उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात का पाणी?.
खोट्या गुन्ह्यात फडणवीस-शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न; अहवालातून मोठी...
खोट्या गुन्ह्यात फडणवीस-शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न; अहवालातून मोठी....