AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran News Update : मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प म्हणतात तसं इराणमध्ये रेजींम चेंज म्हणजे सत्ता बदलाच खेळ सुरु पण..

Iran News Update : हेजाजी यांनी आधीच इशारा दिलेला की, मोजतबा यांच्याकडे सत्ता सोपवली तर IRGC चं नियंत्रण अजून मजबूत होईल आणि नागरिक संस्था कमकुवत होतील. म्हणून आता त्यांना हटवण्याची प्रोसेस सुरु झालीय. इराणमध्ये जे घडू लागलय ते मात्र अमेरिका-इस्रायल दोघांच्या फायद्याचं आहे.

Iran News Update : मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प म्हणतात तसं इराणमध्ये रेजींम चेंज म्हणजे सत्ता बदलाच खेळ सुरु पण..
masoud pezeshkian
| Updated on: Apr 01, 2026 | 3:24 PM
Share

अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात युद्ध सुरु केलं ते सत्ता बदलासाठी. रेजींम चेंज हा त्यांचा उद्देश होता. आता इराणमध्ये तेच घडतय. पण अमेरिका आणि इस्रायलला जे अपेक्षित आहे तसं नाहीय. मिडिल ईस्टमधील या युद्धा दरम्यान आता इराणच्या आतमध्येच सत्ता संघर्ष सुरु झालाय. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियाने यांच्या अधिकारावर गदा येऊ लागली आहे. त्यांची भूमिका मर्यादीत होऊ लागली आहे. तेच इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचा (IRGC) प्रभाव इराणमध्ये वाढू लागला आहे. इराणच्या मिडिया रिपोर्टनुसार पेजेशकियान सरकार राजकीय डेडलॉकमध्ये पोहोचलं आहे. अनेक महत्वाचे निर्णय आणि नियुक्त्या आयआरजीसीने रोखून ठेवल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रपती, त्यांचे अधिकार निष्प्रभावी ठरु लागले आहेत. अलीकडे गोपनीय मंत्र्याची नियुक्ती करताना हीच स्थिती दिसली. पेजेशकियान यांनी प्रस्तावित केलेली सर्व नावं फेटाळण्यात आली.

रिपोर्ट्सनुसार, युद्धाच्या संवेदनशील स्थितीत आणि महत्वाच्या पदांवर नियुक्तीचा अधिकार फक्त IRGC कडेच राहील असं आयआरजीसीचे वरिष्ठ कमांडर अहमद वहीदी यांनी स्पष्ट केलं. म्हणूनच राष्ट्रपतींकडून आलेल्या नावांचा पुढे विचार झाला नाही. यात हुसैन देहगान यांचं सुद्धा नाव होतं. इराणच्या राजकीय व्यवस्थेत सामान्यत: राष्ट्रपती गोपनीय मंत्र्यांचं नाव प्रस्तावित करतात. पण अंतिम मंजुरी सुप्रीम लीडरची असते. मागच्या काही काळापासून सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई यांची स्थिती आणि लोकेशन या बद्दल अनिश्चितता आहे. त्याचा फायदा उचलत IRGC आता सुरक्षा तंत्र आणि निर्णयाधिकार आपल्या अधिकार कक्षेखाली आणत आहे.

रिपोर्टही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीयत

इराण इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार सध्या एक प्रकारची मिलिट्री परिषद बनली आहे. यात IRGC च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते महत्वाचे निर्णय घेत आहेत. मोजतबा खामेनेई यांच्या आसपास सुरक्षेचं कड बनवण्यात आलेलं आहे. सरकारकडून पाठवले जाणारे रिपोर्टही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीयत.

अमेरिका आणि इस्रायलाठी अनुकूल संकेत

राष्ट्रपति पेजेशकियान यांनी अलीकडेच मोजतबा खामेनेई यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. यावरुन हे दिसतं की सत्तेच्या सर्वोच्च केंद्रापर्यंत ते सुद्धा पोहोचू शकत नाहीयत. सुप्रीम लीडरचे जे निकटवर्तीय आहेत, त्यांच्यातही आपसात बेबनाव निर्माण झाल्याच्या बातम्या आहेत. हे अमेरिका आणि इस्रायलाठी अनुकूल संकेत आहेत. त्यांना हेच हवं आहे.

इराणच्या राजकीय व्यवस्थेच्या मूळ सिद्धांताच्या विरोधात

रिपोर्ट्सनुसार, अली असगर हेजाजी यांना हटवण्यासाठी दबाव टाकला जात आहे. हेजाजी यांचा फार आधीपासून मोजतबा खामेनेई यांना उत्तराधिकारी निवडण्यास विरोध होता. वंशवादाच्या आधारावर सत्ता हस्तांतरण इराणच्या राजकीय व्यवस्थेच्या मूळ सिद्धांताच्या विरोधात आहे असं त्यांचं म्हणणं होतं.

Follow Us
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा...
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा आणि वाढते दर चिंतेचा विषय
थकीत बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, वडेट्टीवारांनी सरकारवर साधल निशाणा
गजानन देवकते प्रकरण: थकलेल्या बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, विजय वडेट्टीवारांनी सरकारवर साधला निशाणा.
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर...
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
MPSC FDA पेपरफुटी: अभिमन्यू पवारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
औषध निरीक्षक परीक्षा रद्द: पेपरफुटीमागे कोण?
एका प्रियकरामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका
MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती,
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती, असं काही केलं की...
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...