AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्राईलचा ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला,नेतान्याहू म्हणाले अमेरिकेने केले तेच…

इस्राईलने मंगळवारी कतारची राजधानी दोहा येथे हवाई हल्ला केला आहे. त्यानंतर आता इस्राईलशी युद्धविराम करणार नाही अशी भूमिका हमासने घेतली आहे. त्यामुले हे युद्ध वाढतच जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

इस्राईलचा ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला,नेतान्याहू म्हणाले अमेरिकेने केले तेच...
| Updated on: Sep 12, 2025 | 5:16 PM
Share

इस्राईलने गेल्या ७२ तासात ६ मुस्लीम देशांवर हल्ले केले आहेत. यात गाझा ( पॅलेस्टाईन) सह सिरिया, लेबनान, कतार,येमेन आणि ट्युनिशिया यांचा समावेश आहे. या हल्ल्यात २०० हून जास्त लोक ठार झाले आहेत तर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. हे हल्ले सोमवार ते बुधवार दरम्यान करण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर अतिरेक्यांच्या ठिकाणांवर आम्ही टार्गेट करुन हे हल्ले केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्या संदर्भात पीएम नेतान्याहू यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

इस्रायली पीएम नेतान्याहू यांनी कतारची राजधानी दोहा येथे हमासच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याची बाजू घेताना याची तुलना ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने केलेल्या कारवाईशी केली आहे. नेतान्याहू यांनी म्हटले आहे की इस्राईलने पणे तेच केले जे अमेरिकेनेने त्यावेळी केले होते.

दोहा – सहा जणांचा मृत्यू

इस्राईली सैन्याने मंगळवारी कतारची राजधानी दोहावर हवाई हल्ला केला होता. या हल्ला इमासचे चीफ खलील अल-हय्या यांना ठार करण्यासाठी केला होतात. या हल्ल्यात अल-हय्या यांचा मुलगा, ऑफीस डायरेक्टर, तीन गार्ड आणि कतारचा एका सुरक्षा अधिकाऱ्यांसह ६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

या हल्ल्याच्या वेळी हमास नेता अमेरिकेच्या युद्धविराम प्रस्तावावर आपसात चर्चा करत होते. या हल्ल्यानंतर हमासने युद्धविरामास नकार दिला आहे.

लेबनॉन- ५ जण ठार

इस्राईलने सोमवारी पूर्व लेबनॉनच्या बेका आणि हरमेल जिल्ह्यात केलेल्या हवाई हल्ल्यात ५ जण ठार झाले आहेत. इस्राईली सैन्याने दावा केला आहे की या हल्ल्यात हेजबोल्लाहच्या सैन्य तळांना टार्गेट करण्यात आले. यावर हेजबोल्लाहने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मंगळवारी इस्राईली ड्रोननी हेजबोल्लाहच्या एका सदस्यावर हल्ला केला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये इस्राईल आणि लेबनॉनमध्ये सीझफायर झाला होता. परंतू यानंतरही इस्राईल लेबनॉनच्या दक्षिण भागावरही हल्ले करत होता.

सिरिया- नुकसानीची माहिती दिली नाही

इस्राईली फायटर जेटने सोमवारी सिरियाच्या एअरफोर्स बेस आणि सैन्याच्या कँपवर हल्ला केला. सिरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राईट्स (SOHR)च्या मते यात कोणी जखमी वा मृत झाल्याची माहिती मिळालेली नाही.

या हल्ल्यांना सिरियाच्या परराष्ट्र तसेच पर्यटन मंत्रालयाने देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हटले आहे. ते म्हणाले की इस्राईल राष्ट्रीय आणि क्षेत्रीय सुरक्षेसाठी खतरा आहे.सिरिया आणि इस्राईलमध्ये १९७४ मध्ये सैन्य माघार करारानुसार एकमेकांवर हल्ले न करण्यावर सहमती झाली होती. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या पतनानंतर इस्राईल सैन्य सातत्याने सिरियाच्या सैन्य तळ आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करीत आहे.SOHR च्या अहवालानुसार यावर्षी इस्राईलने सिरियावर ८६ हवाई आणि ११ जमीनी हल्ले केले. त्यात ६१ लोक ठार झाले तर १३५ जागांना लक्ष्य करण्यात आले.

ट्यूनीशिया- एकही मृत्यू नाही

इस्राईली ड्रोनने सोमवारी रात्री ट्युनिशीयाच्या पोर्टवर एका फॅमिली बोटीवर हल्ला केला. त्यात ६ लोक होते. जे पोर्तूगालचा झेंडा लावून प्रवास करत होते. GSF च्यामते यात कोणाचाही मृ्त्यू झाला नाही. इस्राईली ड्रोनने मंगळवारी देखील ब्रिटनचा झेंडा असलेल्या जहाजावर हल्ला केला होता. २०१० पासून आतापर्यंत गाझाच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर इस्राईली ड्रोनने हल्ले होत आहेत.

येमेन- १० लोकांचा मृत्यू

इस्राईलने बुधवारी येमेनची राजधानी सनावर पंधरवड्यात दुसरा हल्ला केला. यात हुती अड्ड्यांना टार्गेट केले गेले. हा हल्ला सना विमानतळावर केला. याआधी सनावर इस्राईलने २८ ऑगस्ट रोजी केलेल्या हल्ल्यात हुती पंतप्रधान अहमद अल-रहावी यांच्या सह १० जण ठार तर ९० जखमी झाले होते.

 गाझा- दीडशे लोकांचा मृत्यू

इस्राईली हल्ल्यात सोमवारी गाझात सुमारे १५० लोक ठार झाले आहेत. आणि ५४० जखमी झाले आहेत. गाझात २०२३ पासून आतापर्यंत ६४,६०० हून अधिक पॅलेस्टाईन लोक ठार झाले आहेत. गाझात आतापर्यंत ४०० लोक उपासमारीने आणि हजारो लोक इमारतींच्या खाली सापडून मेले आहेत. गाझापट्टीचा सुमारे ७५ टक्के भाग इस्राईलच्या ताब्यात आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.