इटलीतील G7 मध्ये भारताची छाप, परदेशातील सर्वांचे नमस्तेने स्वागत
g 7 summit: जगात सध्या दोन युद्ध सुरु आहेत. तसेच चीन आणि अमेरिकेत स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे या परिषदेत अनेक जागतिक मुद्यांवर चर्चा होणार आहे. चीन, युक्रेन, इस्त्राईल, हमास यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

जी 7 शिखर परिषद 13 जूनपासून इटलीत सुरु झाली आहे. 15 जूनपर्यंत चालणाऱ्या या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ पोहचले. इटलीच्या अपुलिया भागातील बोर्गो एग्नाझिया या रिसॉर्टमध्ये हे संमेलन होत आहे. या परिषदेत भारताची छाप दिसून आली. परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांचे त्यांनी नमस्ते म्हणत स्वागत केले.
आगळवेगळे स्वागत
इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पाहुण्यांचे वेगळ्या पद्धतीने स्वागत केले. त्यांनी जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन यांना शुभेच्छा दिल्या. भारतीय शैलीत स्वागत करतानाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परिषदेत बिडेन आणि ऋषी सुनक यांचेही जोरदार स्वागत करण्यात आले.

G7 Summit with ‘namaste’
भारत अतिथी देश
या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी ही गेले आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. वास्तविक, भारत G7 परिषदेत अतिथी देश म्हणून सहभागी होतो. भारताला G7 परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण मिळण्याची ही 11वी वेळ आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मुद्द्यांवर बोलणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ते G7 परिषदेत भारतासह ग्लोबल साउथचे मुद्देही मांडतील. G7 मध्ये अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा आणि जपानचा समावेश आहे. यंदा इटली G7 चे अध्यक्षपद आहे.
Atterrato in Italia per partecipare al Vertice G7. Impaziente di avviare interazioni produttive con i leader del mondo. Insieme, desideriamo affrontare le questioni globali e incoraggiare la cooperazione internazionale per un futuro migliore. pic.twitter.com/rUP9Nw63YY
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2024
जगात सध्या दोन युद्ध सुरु आहेत. तसेच चीन आणि अमेरिकेत स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे या परिषदेत अनेक जागतिक मुद्यांवर चर्चा होणार आहे. चीन, युक्रेन, इस्त्राईल, हमास यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
