AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानपदी 12 वर्ष पूर्ण झाली म्हणून इटलीहून जॉर्जिया मेलोनी यांचा पीएम मोदींना खास संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून 12 वर्ष पूर्ण झाली. निवडलेले पंतप्रधान म्हणून त्यांचा 4,399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा रेकॉर्ड मोडला.

पंतप्रधानपदी 12 वर्ष पूर्ण झाली म्हणून इटलीहून जॉर्जिया मेलोनी यांचा पीएम मोदींना खास संदेश
Modi-giorgia meloni
| Updated on: Jun 10, 2026 | 3:10 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेकॉर्ड केला आहे. देशात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ते बनले आहेत. त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम मागे टाकला. नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षाचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. ही एक खास उपलब्धी असून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरातून शुभेच्छा संदेश येत आहेत. इटलीच्या पंतप्रधानांनी आपल्या संदेशात लिहिलय की, “नरेंद्र मोदी यांना हार्दिक शुभेच्छा! आज ते भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान बनले आहेत”

पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदींसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. “नरेंद्र मोदी हार्दिक शुभेच्छा! आज तुम्ही भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान बनला आहात. अलीकडेच रोममध्ये आपली पुन्हा भेट झाली. भारतासोबत एका विशेष रणनितीक भागीदारीची सुरुवात करताना आनंद होत आहे. त्यामुळे आपल्या देशांना, जनतेला नवीन संधी निर्माण होणार आहेत” असं जॉर्जिया मेलोनी यांनी लिहिलं आहे.

इंदिरा गांधी 14 वर्षापेक्षा जास्त काळ पंतप्रधान 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून 12 वर्ष पूर्ण झाली. निवडलेले पंतप्रधान म्हणून त्यांचा 4,399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा रेकॉर्ड मोडला. या तुलनेसाठी नेहरु यांच्या 1952 पासूनच्या कार्यकाळाला आधार मानण्यात आलय. कारण देशात लोकसभा निवडणुका होण्याआधी 1947 ते 1952 पर्यंत ते अंतरिम सरकारचे प्रमुख होते. माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 14 वर्षापेक्षा जास्त काळ पंतप्रधानपद भूषवलं. पण त्यांचा कार्यकाळ सलग नव्हता. मोदी देशाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान बनले आहेत. 2014 पासून ते सत्तेवर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2014, 2019 आणि 2024 साली लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या.

Follow Us
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?
भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...
Bhiwandi | भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...अनर्थ टाळण्यासाठी मोठी तारांबळ!
पाढरी पट्टी प्रकरणात मोठी अपडेट! 'आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत
पाढरी पट्टी प्रकरणात मोठी अपडेट! 'आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत म्हणून देशपांडेंनी...' जैनी मुंनींचा थेट इशारा
विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन....
VIRAL VIDEO: विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
बसू द्या 8-10 दिवस, CCTV लावा अन्... रोहित पवारांच्या अन्नत्यागावर...
बसू द्या 8-10 दिवस,  CCTV लावा अन्... रोहित पवारांच्या अन्नत्यागावर लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका, म्हणाले, शेतकऱ्यांना...
एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची...
Monsoon Update | एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची चिंता वाढली