AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजा, आता तरी बरस… बळीराजाचे देवाला साकडे, पेरण्या झाल्या पण पाऊस कुठंय?

Farmer and Monsoon : जूनचा दुसरा आठवडा संपत आला आहे पण अजूनही आभाळाने दार उघडलेलं नाही. पावसाचा एकही थेंब जमिनीवर पडलेला नाही, त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.

राजा, आता तरी बरस... बळीराजाचे देवाला साकडे, पेरण्या झाल्या पण पाऊस कुठंय?
Maharashtra Farmer Waiting For RainImage Credit source: Google
| Updated on: Jun 13, 2026 | 6:04 PM
Share

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप पावसाला सुरूवात झालेली नाही. पावसाअभावी शेतकरी अडचणीत सापडू लागला आहे. जूनचा दुसरा आठवडा संपत आला आहे पण अजूनही आभाळाने दार उघडलेलं नाही. पावसाचा एकही थेंब जमिनीवर पडलेला नाही. इकडे शेतकऱ्याने मात्र आशेच्या भरवशावर शेत तयार करून ठेवले आहे. मशागत पूर्ण केली, खत-बियाणे घरात आणून ठेवले, पण आभाळाकडे पाहणारे त्याचे डोळे अजूनही प्रतीक्षेतच आहेत. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशीच स्थिती आहे.

संभाजीनगरमधील शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा

बळीराजासाठी पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही, तर त्याच्या संसाराचा श्वास आहे. याच पावसावर लेकरांच्या शिक्षणाची स्वप्नं अवलंबून आहेत. मुला-मुलींच्या लग्नाची जबाबदारी अवलंबून आहे. घरखर्च, दवाखाना आणि वर्षभराच्या उदरनिर्वाहाची आशा अवलंबून आहे. आज शेतात उभा असलेला शेतकरी काळ्या ढगांची वाट पाहतोय. आभाळाकडे पाहतोय आणि मनोमन एकच प्रार्थना करतोय, “राजा, आता तरी बरस…” कारण जमिनीला ओल हवी आहे, पण त्याहून जास्त ओल या शेतकऱ्याच्या कोरड्या पडलेल्या आशांना हवी आहे. बळीराजा आज चातकाप्रमाणे पावसाच्या एका थेंबाची वाट पाहत आहे. छत्रपती संभाजी नगरच्या भिमवाडीतील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

बुलढाण्यातील शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे

दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरीही पावसाकडे डोळे लावून बसला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे आटोपून तयार ठेवली असून पेरणीची तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र जून महिना अर्धा संपला, रोहिणी नक्षत्र संपले, मृग नक्षत्र सुरू आहे , मात्र पावसाची अपेक्षा लागून आहे . पाऊस पडत नसल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे उघडा ठेऊन उभा आहे. जर लवकर पाऊस पडला नाही, तर उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. देशाच्या काही भागात दुष्काळाचीही भीती आहे. त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते. यामुळे थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...