AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World News Bulletin: सीरिया सरकारचा आपल्याच देशातील रुग्णालयावर हल्ला, वाचा जगातील 5 मोठ्या बातम्या

दोन मिनिटात बघुयात जगातील सर्वात मोठ्या 5 घडामोडींचा आढावा.

World News Bulletin: सीरिया सरकारचा आपल्याच देशातील रुग्णालयावर हल्ला, वाचा जगातील 5 मोठ्या बातम्या
| Updated on: Mar 22, 2021 | 2:03 AM
Share

Latest World News वॉशिंग्टन : रविवारी (21 मार्च) अमेरिका (America) आणि आशियापासून (Asia) मध्यपूर्व जगापर्यंत (Middle East) अनेक मोठ्या घडामोडी घडल्यात. सीरियात सरकारने आपल्या देशातील रुग्णालयावर हल्ला केला (Attack on Hospital in Syria). या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियात भीषण पूर (Australia Floods) आलाय. यात शेकडो घरांचं नुकसान झालंय. दुसरीकडे मिलिट्री डायरेक्टच्या अभ्यासात चीनचं सैन्य (Chinese Army) जगातील सर्वात शक्तीशाली सैन्य असल्याचं म्हटलंय. अमेरिकेने रशियासोबतच्या भारताच्या व्यवहारावरुन थेट इशारा दिलाय. चला तर दोन मिनिटात बघुयात जगातील सर्वात मोठ्या 5 घडामोडींचा आढावा (Latest World News 5 important big news America Asia Middle East Syria attack Australia flood).

1. सीरियामधील सरकारने आपल्याच देशातील रुग्णालयावर तोफेने हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास 5 नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. हा हल्ला इदलिबमधील एका रुग्णालयावर झाला. हे ठिकाण सीरियातील बंडखोरांचा अखेरचा गड मानला जातो.

2. ऑस्ट्रेलियात भयंकर पुरस्थिती तयार झालीय. या पुरात शेकडो घरांचं नुकसान झालंय. या ठिकाणच्या नागरिकांना मध्यरात्रीच्या वेळीच आपली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला. विशेष म्हणजे हा पूर सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यू साउथ वेल्स राज्यात आलाय. अनेक दशकांनंतर असा पूर या भागात पाहायला मिळालाय. त्यामुळे रविवारी (21 मार्च) प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचण्यास सांगितलं आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या पुरामुळे अडकून पडलेल्या शेकडो लोकांना मदत देऊन त्यांची सुटका करण्यात आलीय.

3. आता चीनचं सैन्य जगातील इतर सर्व देशांच्या सैन्याच्या तुलनेत खूप पुढे निघून गेल्याचं समोर आलंय. चीन सैन्याला मिलिट्री डायरेक्ट या संस्थेने केलेल्या अभ्यासात जगातील सर्वात शक्तीशाली सैन्य म्हटलं आहे. 74 गुणांसह अमेरिका या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

4. भारताने रशियासोबत ए-400 मिसाईल सिस्टम खरेदी करण्याबाबत करार केला आहे. मात्र, यावर अमेरिका नाराज असल्याचं समोर आलंय. इतकंच नाही, तर भारताने रशियाकडून हत्यारं खरेदी केल्यास भारतावर निर्बंध लादले जातील असा थेट इशारा अमेरिकेने दिलाय. ही भारताला अप्रत्यक्ष धमकी मानली जात आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन म्हणाले, “भारताने रशियाकडून क्षेपणास्त्र प्रणाली (मिसाईल सिस्टम) खरेदी केल्यास भारतावर निर्बंध लादावे लागतील.”

5. थायलंडमधील राजेशाहीविरोधात जोरदार विरोध प्रदर्शनं होत आहेत. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलकांनी थायलंडमध्ये लोकशाही शासन प्रणाली लागू करण्याची मागणी केलीय. मात्र, पोलिसांनी म्यानमारमधील या आंदोलकांवर बळाचा वापर केलाय.

हेही वाचा :

‘डोक्यावर बंदूक ठेऊन ट्रिगर दाबलं आणि जोरजोराने हसले’, आधी रोसेन, आता नाजनीन, इराणच्या तुरुंगातील छळाच्या घटना

‘माय लॉर्ड! मी एक नाही 16 खून केलेत’, कबुली जबाब ऐकून न्यायाधीशही अवाक, वाचा काय आहे प्रकरण?

History : 20,000 लोकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा, दक्षिण आफ्रिकेतील अंदाधुंद गोळीबारात किती जणांचा मृत्यू?

व्हिडीओ पाहा :

Latest World News 5 important big news America Asia Middle East Syria attack Australia flood

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.