AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातल्या या 5 देशांच्या प्रमुखांची झोप उडाली, केव्हाही हत्या होण्याची सतावतेय भीती

एकीकडे इराण आणि इस्राईलचा संघर्ष संपतो न संपतो सिरियावर इस्राईलने हल्ले केले आहेत. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल शरा यांनी दमिश्क सोडल्याचे म्हटले जात आहे. ते एकटेच राष्ट्रप्रमुख नाही ज्यांच्या जीवाला धोका आहे. जगात 5 राष्ट्रप्रमुखांना त्यांच्या हत्येची भीती वाटत आहे.

जगातल्या या 5 देशांच्या प्रमुखांची झोप उडाली, केव्हाही हत्या होण्याची सतावतेय भीती
| Updated on: Jul 18, 2025 | 7:32 PM
Share

एकीकडे सिरीयाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल शरा इस्राईलच्या हल्ल्यानंतर देशातून पसार झाल्याची बातमी आहे. अशा दावा आहे की त्यांनी दमिश्क सोडले आहे. इस्राईलने सिरियावर मोठा हल्ला केल्यानंतर ते जीव वाचवून पळाले आहेत. एकट्या सिरीयाच्या राष्ट्रप्रमुखांनाच नाही जगातील तैवान, इराण, येमेन आणि आर्मेनिया यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या डोक्यावर मृत्यूची तलवार टांगती आहे. या देशांच्या प्रमुखांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यावर निर्बंध लादले आहेत.

इराणपाठोपाठ इस्राईलने आता सिरियाकडे मोर्चा वळवला आहे. याचे कारण स्वेदा शहरातील ड्रूज आणि बेदौईन गटातील होत असलेल्या झडपांना दिले जात आहे. या दरम्यान सिरियाचे वृत्तपत्र अल मायादीन याने असा दावा केला आहे की सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल शरा यांनी दमिश्क सोडले आहे.ते तुर्कीला गेले असावेत असे म्हटले जात आहे. अल शरा यांच्या आधी असलेल्या राष्ट्राध्यक्ष अल असद यांनाही रशियात आश्रय घ्यावा लागला होता.

देश आणि त्यांच्या प्रमुखांना धोका

1- अहमद अल शरा, सीरिया

अहमद अल शरा यांनी इस्राईलपासून जीवाचा धोका सतावत आहे. वास्तविक सिरियाच्या स्वेदा शहरात भडकलेल्या हिंसेत बळी ठरलेल्या ड्रुज गटामुळे इस्राईल संतापला आहे. एक दिवस आधीच त्याने दमिश्कमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या निवासाजवळ ड्रोन डागून एक प्रकारे सावधानतेचा इशारा दिला होता. याशिवाय इस्राईलची गुप्तहेर एजन्सी मोसाद टार्गेट किलींगमध्ये प्रसिद्ध आहे. इराणमध्ये संपूर्ण जगाने याची चुणूक पाहीली आहे. अशात सिरियातही राष्ट्राध्यक्ष अहमद अल शरा यांना इस्राईलच्या आडून कोणी विरोधक किंवा शत्रू आपले काम तमाम करेल भीती सतावत आहे. त्यामुळे ते देश सोडून पसार झाल्याचे म्हटले जात आहेत.

2- लाई चिंग ते, तैवान

तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग ते यांच्या अडचणीही कमी होण्याचे नाव घेत नाहीएत. त्यांना चीनकडून जीवाचा धोका आहे.चीनने त्यांना अनेकदा धमकी मिळाली आहे. त्यांच्यावर चायना पॉलीसीची अवहेलना केल्याचा आरोप लागत आहे. चीनी सैन्य आणि गुप्तचर संघटना त्यांच्या विरोधात कट रचत असल्याचा संशय आहे. याशिवाय लाई चिंग यांना तैवानमधील चीन समर्थकांकडूनही धोका आहे.

3- अली खामेनेई, इराण

इराणचे सर्वोच्च लीडर अली खामेनेई यांना तर इस्राईलकडून धोका आहेच. अलिकडे इस्राईलने इराणच्या अनेक वरिष्ठ कमांडरचा टार्गेट किलींगमध्ये खात्मा केला आहे. त्यानंतर खामेनेई यांना अनेक दिवस बंकरचा आश्रय घ्यावा लागला. ते बंकरमधून सरकार आणि युद्ध हाताळत होते. कठोर धार्मिक शासन, जनतेतील रोष याचाही त्यांना धोका आहे. इस्राईलच्या मोसाद शिवाय मुजाहिदीन ए खल्क सारख्या विरोधी गटांकडूनही त्यांना धोका आहे.

4- रशद अल अलीमी, येमेन

रशद अल अमीनी येमेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत,त्यांना हुती बंडखोरांकडून सर्वाधिक धोका आहे. देश अस्थिर असल्याने येमेनच्या अनेक भागांवर हुतीचा अड्डा जमला आहे. याआधीही हुतींनी अनेक नेत्यांची हत्या केली आहे. त्यामुळे ते येमेन प्रमुखांना ठार करु शकतात. येमेनमध्ये सातत्याने होणारी हल्ले आणि सत्ता संघर्षाने येथील स्थिती बिकट आहे.मध्य पूर्वेत ज्याप्रकारची स्थिती आहे. येमेनचे हुती ज्याप्रकारे इस्राईल आणि अमेरिकेला टार्गेट करीत आहेत. त्या दोन्ही देशांकडूनही येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशद अल अलीमी यांना धोका आहे.मात्र दोन्ही देशांनी अद्यापर्यंत तरी त्यांना धमकी दिलेली नाही.

5. निकोल पशिनयान, आर्मेनिया

आर्मेनियाच्या पंतप्रधान निकोल पशनियान यांची देखील झोप उडाली आहे. नागोर्नो कराबाख युद्धात हार आणि रशियांशी फाटल्याने त्यांच्या हत्येची त्यांनी भिती सतावत आहे. निकोल यांना प्रामुख्याने अंतर्गत विरोध आणि आर्मिनियन तसेच सैन्यातील गटाकडून धोका आहे. याआधी २०२१ मध्ये त्यांच्यावर हल्ला होणार होता, त्यातून ते वाचले. त्यांच्या राजीनाम्याची अनेकदा मागणी झाली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.