AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मीरचे सोडा, बिझनेसचे बोला, या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना झापलं?

पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी पाकिस्तानसोबत अनेक अनेक करार केले. पण या दरम्यान पाकच्या पंतप्रधानांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना थेट सुनावलं.

काश्मीरचे सोडा, बिझनेसचे बोला, या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना झापलं?
| Updated on: Nov 27, 2024 | 8:00 PM
Share

बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी नुकताच पाकिस्तानला भेट दिली. अलेक्झांडर लुकाशेन्को हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते. लुकाशेन्को सोमवारी तीन दिवसांचा दौऱ्यासाठी आले तेव्हा त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी अनेक क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा झाली. प्रोटोकॉल तोडून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आले होते. लुकाशेन्को यांनी काश्मीर प्रश्नावर भारताच्या विरोधात वक्तव्य करावे अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांनी तसे करण्यास साफ नकार देत शरीफ यांची बोलतीच बंद केली.

पाकिस्तानी पत्रकाराने सांगितले की, शेहबाज शरीफ यांनी अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यासमोर काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. पण यावर बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी कोणतेही वक्तव्य करणार नसल्याचे म्हटले. ते फक्त व्यवसायाबाबत बोलण्यासाठी आले आहेत. बेलारूस आणि पाकिस्तानशी संबंध कसे सुधारता येतील यावरच ते बोलतील. काश्मीर किंवा अन्य कोणत्याही राजकीय मुद्द्यावर ते कोणतेही वक्तव्य करणार नाहीत. अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

आरजू काझमी यांच्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, बेलारशियन नेत्याने ज्या प्रकारे शेहबाज शरीफ यांची मागणी फेटाळली आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यास नकार दिला. ती पाकिस्तान आणि पंतप्रधानांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रत्येक व्यासपीठावर काश्मीरबद्दल बोलणे योग्य नाही. हे पाकिस्तानी लष्कर आणि राजकारण्यांनी समजून घेतले पाहिजे, असेही काझमी म्हणाले.

इस्लामाबादमध्ये इम्रान खान यांच्या अटकेच्या विरोधात पीटीआयने देशभरात निदर्शने केली. पण नंतर निदर्शनं हिंसक झाल्याने पक्षाने आंदोलन मागे घेतलं. या आंदोलनात काश्मिरी लोकं सहभागी होत आहेत का असा प्रश्न जेव्हा पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना विचारला. तेव्हा मोहसिन नक्वी म्हणाले की, काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानात येऊन आंदोलन करू नये कारण काश्मीर ही परदेशी भूमी आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तान अडचणीत आलं. त्यामुळे राजकारण्यांनी सावध राहून बोलावं असं देखील या पत्रकाराने म्हटले आहे.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.